पतीला भावजयीसोबत नको त्या अवस्थेत बघितले, पत्नीने विरोध करताच पतीने थेट…

दहा महिन्यांपूर्वीच लग्न करुन ती घरात आली. डोळ्यात चारचौघींसारखं सुखानं संसार करण्याची स्वप्न होती. पण सासरचा उंबरठा ओलांडताच पुढे काय होणार हे तिला कुठं माहित होतं.

पतीला भावजयीसोबत नको त्या अवस्थेत बघितले, पत्नीने विरोध करताच पतीने थेट...
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा
Image Credit source: Google
| Updated on: Apr 29, 2023 | 1:34 PM

छपरा : पतीच्या अवैध संबंधांना विरोध करणे एका महिलेला महागात पडले आहे. विरोध केल्याची तिला जीव देऊन त्याची किंमत मोजावी लागली आहे. वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाला विरोध करत होती. यामुळे पतीने अखेर संतापजनक पाऊल उचलत पत्नीची हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर पतीसह सासरचे लोक घर सोडून फरार झाले आहेत. नवविवाहित महिलेचा मृतदेह तिच्या सासरची घरी संशयास्पद परिस्थितीत सापडला आहे. प्रिन्स गिरी असे आरोपी पतीचे नाव आहे. तर गुजा असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दहा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत गुंजाचा भाऊ रिपू ​​गिरीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीचे लग्न 10 महिन्यांपूर्वी मौना मिश्री तळी येथील प्रिन्स गिरीसोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी गुंजाला पतीचे त्याच्या वहिनीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. याबाबत ती वारंवार तक्रार करायची. तिच्या तक्रारीमुळे प्रिन्स गुंजाला नेहमी मारहाण करत असे. मात्र, कुटुंबीय आपापसात हे प्रकरण मिटवत होते.

पतीचे वहिनीसोबत आक्षेपार्ह फोटो पाहिले

गुंजाने पतीचे वहिनीसोबत काही आक्षेपार्ह स्थितीत फोटो पाहिल्यानंतर तिने उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तिचा पती संतापला. यानंतर पतीने नवविवाहित पत्नीची हत्या केली. हत्येनंतर पतीसह सासरचे लोक घर सोडून पळून गेले. घराच्या व्हरांड्यात नवविवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत पडला होता. गुंजाच्या हत्येची माहिती मिळताच तिच्या घरी एकच गोंधळ उडाला.