तांत्रिक विद्या मिळवण्यासाठी तरुणाचे भयानक कृत्य, गुरुसोबत जे केले ते पाहून सर्वच हैराण

| Updated on: Feb 02, 2023 | 9:02 PM

रौनक छाबडा याला तांत्रिक विद्या शिकण्याची आवड होती. याचदरम्यान त्याची ओळख पेंटरचे काम करणारा आणि तांत्रिक विद्या जाणणाऱ्या बसंत साहूशी झाली. यानंतर रौनक बसंतकडे तांत्रिक विद्या शिकू लागला.

तांत्रिक विद्या मिळवण्यासाठी तरुणाचे भयानक कृत्य, गुरुसोबत जे केले ते पाहून सर्वच हैराण
तांत्रिक विद्येसाठी शिष्यानेच गुरुला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

धमतरी : छत्तीसगडमध्ये एक भयानक घटना उघडकीस आली आहे. तंत्रसिद्धी शिकणाऱ्या एका तरुणाने आपल्याच गुरुची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुची केवळ हत्याच केली नाही तर त्याचे रक्तही प्यायला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्ण न जळाल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. रौनक छाबडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो रायपूरचा रहिवासी आहे. बसंत साहू असे हत्या करण्यात आलेल्या गुरुचे नाव आहे.

रौनकला तांत्रिक विद्येची आवड होती

रौनक छाबडा याला तांत्रिक विद्या शिकण्याची आवड होती. याचदरम्यान त्याची ओळख पेंटरचे काम करणारा आणि तांत्रिक विद्या जाणणाऱ्या बसंत साहूशी झाली. यानंतर रौनक बसंतकडे तांत्रिक विद्या शिकू लागला. तांत्रिक सिद्धी मिळविण्यासाठी दोघेही अनेक दिवस पूजा-अर्चा करत होते.

गुरुची विद्या मिळवण्यासाठी केली हत्या

यावेळी रौनकला कुणीतरी सांगितले की, जर गुरुचे रक्त प्यायले तर गुरुच्या सर्व तांत्रिक सिद्धी एकाच वेळी प्राप्त होतात. शॉर्टकट मार्गाने विद्या मिळवण्यासाठी रौनकने गुरुच्या हत्येचा कट रचला.

हे सुद्धा वाचा

आधी हत्या केली मग रक्त प्यायला

रौनकने 31 जानेवारी रोजी बसंस साहूच्या डोक्यात वार करत हत्या केली. मग त्याचे रक्त प्यायला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. मात्र मृतदेह पूर्ण जळाला नाही.

सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्या उघडकीस

दुसऱ्या दिवशी पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बसंत साहू शेवटचा रौनकसोबत दिसला.

पोलिसांनी रौनकला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघडकीस आली. गुरुची तांत्रिक विद्या अवगत करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.