Delhi Teacher Attack : शाळेच्या युनिफॉर्मवरुन शिक्षकाने दम दिला, नाराज विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्लाच केला

इंद्रपुरी परिसरातील शहीद अमित वर्मा सर्वोदय विद्यालयात ही घटना घडली आहे. पीडित शिक्षक भूदेव हा तीन महिन्यांपूर्वीच शाळेत पीटी शिक्षक म्हणून रुजू झाला होता. दोन आठवड्यापूर्वी भूदेव अभिमन्यू नामक विद्यार्थ्याल स्कूल युनिफॉर्मवरुन दम दिला होता.

Delhi Teacher Attack : शाळेच्या युनिफॉर्मवरुन शिक्षकाने दम दिला, नाराज विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्लाच केला
वंशाच्या दिव्यासाठी पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
| Updated on: Jan 20, 2023 | 9:58 PM

दिल्ली : शिक्षकाने शाळेच्या युनिफॉर्मवरुन टोकल्याचा राग मनात ठेवून एका शाळकरी विद्यार्थ्याने पीटी शिक्षकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादाक घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शिक्षक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बीएल कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून,पोलीस त्याची चौकशी करत आहेत. अन्य दोन विद्यार्थी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भूदेव असे हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. दिल्लीतील एका सरकारी शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच शाळेत रुजू झाला होता

इंद्रपुरी परिसरातील शहीद अमित वर्मा सर्वोदय विद्यालयात ही घटना घडली आहे. पीडित शिक्षक भूदेव हा तीन महिन्यांपूर्वीच शाळेत पीटी शिक्षक म्हणून रुजू झाला होता. दोन आठवड्यापूर्वी भूदेव अभिमन्यू नामक विद्यार्थ्याल स्कूल युनिफॉर्मवरुन दम दिला होता.

विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला

याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्याने शिक्षकाला धमकी दिली होती. त्याप्रमाणे गुरुवारी त्याने शिक्षकावर हल्ला केला. अभिमन्यू शाळेच्या पहिल्या मजल्यावर दबा धरुन बसला होता. शिक्षक भूदेव जसा वॉशरुमच्या बाहेर येताच दोन विद्यार्थ्यांनी त्याला मागून पकडले. यानंतर अभिमन्यूने त्याच्यावर चाकू हल्ला केला.

शिक्षकांकडून कडक कारवाईची मागणी

एका विद्यार्थ्याला पकडण्यास यश आले तर अन्य दोघे फरार झाले. यानंतर शाळेत तणावाचे वातावरण आहे. शाळेतील शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.