AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Accident : कार आणि कंटनेरचा भीषण अपघात; रयत शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांचा दुर्दैवी मृत्यू

साकुरी शिवारातून नगर मनमाड महामार्गावरून बर्डे हे स्वतःच्या अल्टो कारने राहाता येथे घराकडे चालले होते. यावेळी कार भरधाव वेगात असल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने पुढे चाललेल्या टेम्पोला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.

Ahmednagar Accident : कार आणि कंटनेरचा भीषण अपघात; रयत शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांचा दुर्दैवी मृत्यू
कार आणि कंटेनर अपघातात प्राचार्यांचा मृत्यूImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 20, 2023 | 8:15 PM
Share

राहाता / अहमदनगर : नगर मनमाड महामार्गावर शिर्डी नजीक झालेल्या अवजड कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघाताची घटना आज उघडकीस आली. या अपघातात रयत शिक्षण संस्थेचे जेष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात बर्डे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात गंभीर जखमी बर्डे यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राहाता येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या प्राचार्य राजेंद्र बर्डे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाहनावरील ताबा सुटल्याने कारची टेम्पोला धडक

गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास साकुरी शिवारातून नगर मनमाड महामार्गावरून बर्डे हे स्वतःच्या अल्टो कारने राहाता येथे घराकडे चालले होते. यावेळी कार भरधाव वेगात असल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघातात गंभीर दुखापत झाल्याने प्राचार्यांचा जागीच मृत्यू

या अपघातात कारचा चक्काचूर झाला. तर बर्डे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राहाता शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलाचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि तालुक्यातील चितळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे बर्डे हे प्राचार्य होते.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड