Mumbai : घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये रोड रोमियोला नागरिकांची बेदम मारहाण, अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड

मागच्या काही दिवसांपासून एक रोड रोमियो शाळेत जात असलेल्या मुलींची छेड काढीत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. नागरिक फक्त एका तक्रारीची वाट पाहत होते. आज आरोपीने एका मुलीची छेड काढल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली.

Mumbai : घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये रोड रोमियोला नागरिकांची बेदम मारहाण,  अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड
police
Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 24, 2023 | 12:49 PM

मुंबई : राज्यात (Maharashtra) मुलींची छेड काढण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर अनेक आरोपींना पोलिसांनी (Mumbai Police) शिक्षा दिली आहे. परंतु तरीही अशी प्रकरण उघडकीस येत आहेत. मुंबईतल्या घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये (Ghatkopar Kamrajnagar) एका रोड रोमिओला रहिवाशांनी मारहाण केली आहे. एका 12 वर्षाच्या मुलीची छेड काढत असताना तिथं असलेल्या नागरिकांनी त्याचा चांगला चोप दिल्याची माहिती समजली आहे. ज्याला नागरिकांनी मारहाण केली, तो शाळेत जात असलेल्या मुलींना मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी आरोपी कृत्य करित होता. त्यावेळी त्याला मारहाण करुन नागरिकांनी त्यांची अर्धनग्न अवस्थेत वरात काढली.

अर्धनग्न अवस्थेत वरात देखील काढण्यात आली

मागच्या काही दिवसांपासून एक रोड रोमियो शाळेत जात असलेल्या मुलींची छेड काढीत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. नागरिक फक्त एका तक्रारीची वाट पाहत होते. आज आरोपीने एका मुलीची छेड काढल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. तसेच त्याची तिथं अर्धनग्न अवस्थेत वरात देखील काढण्यात आली. नागरिकांनी भर रस्त्यात ऊठाबशा काढायला लावल्या आणि तोंडाला काळ देखील फासलं आहे. रोडरोमियोच्या बहिणीने सुध्दा त्याला चोपला आहे. सदर घटनेचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. प्रकरणाची पोलिसांनी घेतली दखल घेतली असून तक्रार नोंद करण्याचं काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

सीसीटिव्हीच्या तपासानंतर अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता

पोलिस व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पुरावे जमा करायला सुरुवात केली आहे. तसेच तिथले काही सीसीटिव्ही सुध्दा चेक केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तिथं अनेक मुलं छेडछाड करीत आहेत. त्यामुळे तिथल्या अनेक मुलांवरती कारवाई करण्यात येणार आहे. सध्या संबंधित आरोपीला पोलिस ताब्यात घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी कितीजण असतात त्याची देखील चौकशी होणार आहे.