मेव्हणीसोबत संबंध तोडायला सांगत होता, मात्र तो ऐकत नव्हता अखेर…

एका तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. हे प्रेम तरुणीच्या भावोजीला मंजूर नव्हते. त्याने अनेकदा हे संबंध तोडण्यास सांगितले मात्र तरुण ऐकत नव्हता.

मेव्हणीसोबत संबंध तोडायला सांगत होता, मात्र तो ऐकत नव्हता अखेर...
नांदेडमध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाला संपवले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 18, 2023 | 1:19 PM

नांदेड / 18 जुलै 2023 : प्रेमप्रकरणाच्या वादातून भावोजीने मेव्हणीच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्या नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. किरण माने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर शिवा माने असे आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. या घटनेमुळे जुन्या नांदेडमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. मेहुणीच्या प्रेमसंबंधातून भावोजीने जे केले ते पाहून कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हता मयत तरुण

किरण मानेचे शिवा मानेच्या मेहुणीशी प्रेमसंबंध सुरु होते. हे संबंध शिवाला मान्य नव्हते. शिवा वारंवार हे संबंध संपवण्यासाठी किरणला सांगत होता. या कारणातून अनेकदा किरण माने आणि शिवा माने यांच्यात वाद झाले. मात्र किरण प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हता. यामुळे किरणला संताप अनावर झाला. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने किरणचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.

हल्ल्यात किरण मानेचा जागीच मृत्यू

ठरल्याप्रमाणे मुख्य आरोपी शिवा माने, सुभाष माने आणि अन्य आरोपींनी काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास किरण मानेला गाठत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात किरण मानेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.