AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग…, तरुणीची पोलिसात धाव

एका तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. तरुणाने तिच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिषही दाखवले. यानंतर दोघांनी आपल्या नात्याची मर्यादा ओलांडली. पण नंतर जे समोर आलं त्याने तरुणीला धक्काच बसला.

लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग..., तरुणीची पोलिसात धाव
हळूहळू दोघे भेटू लागले, काही दिवसांनी या दिग्गज खेळाडूने तिचं मन जिंकलं. शेवटी तिने विवाहित नवऱ्याला 1999 मध्ये घटस्फोट दिला आणि खेळाडूसोबत लग्न केलं.Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 05, 2023 | 12:09 PM
Share

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीकडून पैसेही उकळले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम पायगुडे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. शुभमसह पाच जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची फसवणूक करत आरोपीने घरच्यांच्या मर्जीने दुसऱ्या मुलीशी साखरपुडाही केला. पुण्यातील वडगाव शेरी येथील एका 23 वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या तरुणीला धमकावण्यात आले. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध, पैसेही उकळले

तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शुभमने फिर्यादी तरुणीला आधी लग्नाचे आमिष दाखवले. कात्रज येथील एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शिवाय लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्याकडून एक लाख रुपये उकळले. शुभमच्या भावाला याबाबत माहिती कळताच त्याने, या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत घरी सांगितले.

प्रेमसंबंधांची माहिती मिळताच शुभमच्या कुटुंबीयांनी फिर्यादी तरुणीला शिवीगाळ केली. शिवाय शुभमचा दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी तरुणी गेल्यानंतर तिला धमकवण्यात आले. याप्रकरणी शुभम पायगुडे यांच्यासह पाच जणांविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?