दोघेही कामानिमित्त पुण्यात आले होते, मग दोघांमध्ये प्रेम जुळले, मात्र पुढे घडले त्याने शहर हादरले !

दोघेही वेगवेगळ्या जिल्ह्यातून कामानिमित्त पुण्यात आले होते. तेथे त्यांची भेट झाली आणि प्रेमसंबंध जुळले. मग दोघे एकत्र राहू लागले. पुढे जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

दोघेही कामानिमित्त पुण्यात आले होते, मग दोघांमध्ये प्रेम जुळले, मात्र पुढे घडले त्याने शहर हादरले !
प्रेमप्रकरणातील वादातून प्रेयसीनेच प्रियकराला संपवले
Image Credit source: google
| Edited By: | Updated on: May 29, 2023 | 12:55 PM

वाघोली : पुणे जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघेही मागील काही महिन्यांपासून राहत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराचा मृतदेह सापडला आहे. यशवंत महेश मुंढे असे मयत तरुणाचे नाव असून, तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर अनुजा महेश पनाळे असे हत्या करणाऱ्या तरुणीचे नाव असून, ती मूळची नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुग्णालात शवविच्छेदनासाठी पाठवला.

दोघेही एकत्र भाड्याच्या खोलीत राहत होते

यशवंत आणि अनुजा या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघेही पुण्यात नोकरीनिमित्त आले होते. पुण्यातील वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत दोघे एकत्र राहत होते. दोघांमध्ये कशावरुन वाद झाला ते कळले नाही. मात्र पहाटे प्रेयसीने चाकूने प्रियकराच्या सर्वांगावर वार केले. तसेच प्रेयसीही यात जखमी झाली आहे. घटना उघड होताच तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

लोणीकंद पोलिसांकडून पुढील तपास सुरु

शेजाऱ्यांनी घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासाअंतीच दोघांमध्ये नेमका काय वाद होता हे उघड होईल.