जावई आणि सासूमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला, बायको आणि तीन मुलं सोडून फरार झाला !

सिरोही जिल्ह्यातील सियांकारा गावातील रहिवासी रमेश जोगी यांच्या मुलीचा मामावली गावात राहणाऱ्या नारायण जोगीसोबत विवाह झाला होता. नारायणला तीन मुले आहेत.

जावई आणि सासूमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला, बायको आणि तीन मुलं सोडून फरार झाला !
प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवले
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 03, 2023 | 5:51 PM

सिरोही : प्रेमाला वय, जात, धर्म नसतो हे आपण ऐकलं आहे. पण राजस्थानमध्ये तर प्रेमात नातीच खोटी ठरल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील सिरोही येथे ही घटना घडली आहे. चार मुलांची आई असलेल्या सासूचा आणि जावयाचा एकमेकांवर जीव जडला. यानंतर जावई आणि सासू दोघेही पळून गेले आहेत. याप्रकरणी सासऱ्याने जावयाविरोधात सासूला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करत दोघांचा शोध सुरु केला आहे.

जावयाला तीन मुले तर सासूला चार मुले

सिरोही जिल्ह्यातील सियांकारा गावातील रहिवासी रमेश जोगी यांच्या मुलीचा मामावली गावात राहणाऱ्या नारायण जोगीसोबत विवाह झाला होता. नारायणला तीन मुले आहेत. तर सासूला तीन मुली आणि एक मुलगा असून सर्व विवाहित आहेत.

आधी सासऱ्यासोबत दारु प्यायला

जावई नारायण 30 डिसेंबर रोजी सासरवाडीला आला होता. त्यानंतर तो आपले सासरे रमेश जोगी यांच्यासोबत बसून दारु प्यायला. भरपूर दारु प्यायल्याने नशेत धुंद रमेशला झोप लागली. सायंकाळी 44 वाजता जेव्हा रमेशला जाग आली तेव्हा पत्नी आणि जावई घरी नव्हते.

सासऱ्याकडून सासूला जावयाने पळवून नेल्याची तक्रार दाखल

रमेशने आसपास दोघांनाही खूप शोधले, मात्र दोघांचाही काही थांगपत्ता लागला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी रोजी रमेशने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. जावई आपल्या पत्नीला फूस लावून घेऊन गेल्याचे रमेशने पोलिसांना सांगितले.

नारायण पत्नीसह आपल्या एका मुलीलाही घेऊन गेल्याचा आरोप रमेशने केला आहे. याप्रकरणी पोलीस सासू आणि जावयाचा कसून शोध घेत आहेत.