जेवण करण्याच्या कारणातून पती-पत्नीचा वाद झाला, मग पत्नीने थेट…

पती-पत्नीचा काही कारणातून वाद झाला. मग हळूहळू वाद इतका वाढला की, जे घडू नये ते घडले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जेवण करण्याच्या कारणातून पती-पत्नीचा वाद झाला, मग पत्नीने थेट...
कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला संपवले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 24, 2023 | 4:43 PM

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथे मुलाने जन्मदात्या वडिलांची ट्रॅक्टर अंगावर घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक हत्याकांड घडले आहे. एकाच दिवसात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एरंडोली येथे पारधी बेघर वस्तीवर ही धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून पत्नीने चाकूने भोकसून पतीची हत्या केली आहे. एरंडोली येथील पारधी वस्तीवर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मिरज ग्रामीण पोलिसांची मात्र ग्रामीण हद्दीत दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. सुभेदार आनंदराव काळे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घरगुती वादातून हत्याकांड

आरोपी चांदणी काळे आणि पती सुभेदार काळे यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादात चांदणी हिने सुभेदार काळे यांच्या छातीत वार केला. या वादामध्ये चांदणीवरही सुभेदारने चाकूने हल्ला केल्याचे समजते. जेवण करण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती मिळते. चांदणी काळे ही घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी चांदणी काळे हिचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना केली आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनेचा पंचनामा करुन मिरज ग्रामीण पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पारधी वस्तीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पैशाच्या वादातून मिरजमध्ये मुलाने बापाला संपवले

उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून मुलाने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मिरजमध्ये घडली आहे. बापाची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.