दुसरीही मुलगीच झाली, नाराज पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

मय विवाहिता राजनंदिनी सरनोबत हिला दोन मुली आहेत. पहिली मुलगी अडीच वर्षाची तर दुसरी मुलगी सहा महिन्यांची आहे.

दुसरीही मुलगीच झाली, नाराज पतीने उचलले हे टोकाचे पाऊल
दोन्ही मुलीच झाल्याच्या रागातून पतीनेउचलले टोकाचे पाऊल
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 6:10 PM

सांगली : दुसरीही मुलगी (Girl)च झाल्याच्या रागातून नाराज पतीने पत्नी (Wife)ला संपवल्याची धक्कादाक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे उघडकीस आली आहे. कौस्तुभ कृष्णराव सरनोबत असे या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

विवाहितेला दोन मुली

सांगलीच्या इस्लामपूर येथे कोळी मळा परिसरात सरनोबत कुटुंबीय राहतात. मयत विवाहिता राजनंदिनी सरनोबत हिला दोन मुली आहेत. पहिली मुलगी अडीच वर्षाची तर दुसरी मुलगी सहा महिन्यांची आहे.

दोन्ही मुलीच झाल्याने पती नाराज

कौस्तुभला मुलगा हवा होता. मात्र दोन्ही मुलीच झाल्याने राजनंदिनीचा पती कौस्तुभ हा नाराज होता. याच रागातून तो पत्नी राजनंदिनीला मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने रविवारी पहाटे बाईकवरुन घेऊन गेला.

नाराजीतून पत्नीला विहिरीत ढकलले

कापूसखेड गावच्या हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्याजवळ असलेल्या एका शेताजवळ बाईक थांबवली आणि तेथेच असलेल्या विहिरीत पत्नीला ढकलून दिले. पत्नीला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला.

घातपात करुन अपघाताचा बनाव

पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कौस्तुभने इस्लामपूर पोलिसात पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. विहिरीजवळ लघुशंकेसाठी गेली असताना पत्नी पाय घसरुन पडली आणि त्याच तिचा मृत्यू झाल्याचे कौस्तुभने पोलिसांना सांगितले.

माहेरच्यांच्या मागणीमुळे पोलीस चौकशीत घातपात उघड

मात्र राजनंदिनीच्या माहेरच्या लोकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली. तसेच पोलिसांनी याबाबत चौकशी करावी अशी मागणी उचलून धरली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

आरोपी पती अटक

यानंतर राजनंदिनी यांचे नातेवाईक मिलिंद सावंत यांच्या फिर्यादीवरुन इस्लामपूर पोलिसांनी कौस्तुभ सरनोबत याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.