AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामावरील मैत्री घरांपर्यंत नेली, तिथेच गेम झाला; मित्रानेचं बायकोसोबत…

एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. मग मित्राच्या घरी येणे-जाणे सुरु झाले. मित्राच्या घरी येता येता मित्राने त्याचेच घर उद्धवस्त केले.

कामावरील मैत्री घरांपर्यंत नेली, तिथेच गेम झाला; मित्रानेचं बायकोसोबत...
जुन्या वादातून मित्राने मित्राला संपवले
| Updated on: Apr 13, 2023 | 6:03 PM
Share

हरिद्वार : प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री एक महत्वपूर्ण नातं असतं. आपल्या आयुष्यातील सर्व सुख-दुःख आपण सर्वात आधी आपल्या मित्राकडे शेअर करतो. पण उत्तराखंडमध्ये मित्रच मित्राचा काळ बनून आल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध जोडून आपल्या मार्गात काटा बनणाऱ्या मित्राला संपवल्याची घटना हरिद्वारमध्ये उघडकीस आली आहे. मित्राची हत्या केल्यानंतर मृतदेह कालव्यात फेकून आरोपी फरार झाला. पोलिसांना मृतदेह मिळाल्यानंतर ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. मात्र अखेर प्रकरणाचा पर्दाफाश झालाच. पोलिसांनी मयताची पत्नी आणि मित्र दोघांनाही अटक केली आहे.

पेशाने ट्रक चालक असल्याने कामाच्या ठिकाणी दोघांची मैत्री झाली

हेमेंद्र असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पेशाने ट्रक चालक आहे. आरोपी मोहम्मद शारुफ हा देखील ट्रक चालक आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी दोघांची ओळख झाली. मग मोहम्मदचे हेमेंद्रच्या घरी येणे-जाणे सुरु झाले. यादरम्यान मोहम्मदचे हेमेंद्रच्या पत्नीशी प्रेमसंबंध जुळले. तब्बल सहा वर्ष दोघांचे चोरी छुपे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र याची माहिती हेमेंद्रला मिळाल्यानंतर त्याने यास विरोध केला. यामुळे मोहम्मद आणि हेमेंद्रच्या पत्नीने त्याला मार्गातून दूर करण्याचा कट रचला.

जेवणाच्या बहाण्याने बोलावून हत्या केली

मोहम्मदने 11 मार्च रोजी हेमेंद्रला जेवायला जायच्या बहाण्याने भगवानपूरला बोलावले. मग तेथे त्याला भरपूर दारु पाजली आणि दारुच्या नशेत असताना त्याची हत्या केली. हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकला. यानंतर 10 दिवसांनी हेमेंद्रच्या पत्नीने सासरच्यांना तो गायब असल्याची माहिती दिली. हेमेद्रच्या वडिलांनी मोहरपाल पोलिसात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पत्नीच्या सीआर रिपोर्टमुळे सत्य उघड

बेपत्ता हेमेंद्रचा शोध घेत असतानाच पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय येत होता. पोलिसांनी पत्नीच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट मागवला. यात पत्नीचे दररोज एका व्यक्तीशी बोलणे होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हेमेंद्रचे शेवटचे लोकेशन तपासले असता या नंबरचे आणि हेमेंद्रचे शेवटचे लोकेशन सारखेच होते. यावरुन पोलिसांनी पत्नी आणि मोहम्मदला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर हेमेंद्रच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी दोघांना अटक केली.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.