एनआयए छापा, इंदुरचा बडा व्यापारी अटकेत, ‘या’ गुन्ह्याप्रकरणी कारवाई

| Updated on: Sep 23, 2022 | 5:39 PM

एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणी देशभरातील 13 राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. यामध्ये 106 जणांना अटक करण्यात आली आहे.

एनआयए छापा, इंदुरचा बडा व्यापारी अटकेत, या गुन्ह्याप्रकरणी कारवाई
Image Credit source: social media
Follow us on

इंदूर : एनआयएने टेरर फंडिंग (Terror Funding) संदर्भात देशभरात छापेमारी (Raid) केली. या छाप्यानंतर इंदूरच्या एका व्यावसायिकाला टेरर फंडिंग प्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. अब्दुल करीम बेकरीवाला असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. यंदा रामनवमीला खरगोनमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये बकेरीवालाचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. बकेरीवाला हा पीएफआयचा प्रदेशाध्यक्ष आहे.

एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणी देशभरातील 13 राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. यामध्ये 106 जणांना अटक करण्यात आली आहे. इंदूर – उज्जैनमध्येही पीएफआयच्या तळांवर छापे टाकून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

चौघांपैकी तीन जणांना इंदूरमधून तर एकाला उज्जैनमधून अटक करण्यात आली आहे. एनआयएने या सर्वांना दिल्लीला नेले आहे. तेथे त्यांची चौकशी केली जाईल.

हे सुद्धा वाचा

मध्यरात्री नंतर छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने मध्यरात्रीनंतर पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान इंदूर आणि उज्जैनमध्येही छापे टाकण्यात आले. एनआयएची टीम इंदूरहून 3 जणांना घेऊन दिल्लीला गेली.

उज्जैनमधून पीएफआयच्या एका पदाधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. इंदूरमध्ये, एनआयएच्या पथकाने जवाहर मार्गावरील पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकत अनेक कागदपत्रे जप्त केली.

याशिवाय एनआयएने सदर बाजार पोलीस स्टेशन परिसर, खजराना, छत्रीपुरा, खातीवाला टँक आणि चिपा बखल भागात छापे टाकून पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल करीम बेकरीवाला आणि दोन पदाधिकारी अब्दुल जावेद आणि रफिक यांना ताब्यात घेतले. पीएफआयचे राज्य सरचिटणीस जमील शेख यांना उज्जैन येथून अटक करण्यात आली.

अब्दुल करीम बेकरीवाला इंदूरमधील मोठे नाव

एनआयएने घराच्या झडतीदरम्यान काही पुस्तके आणि कागदपत्रे जप्त केली. जप्त केलेले सामान घेऊन एनआयए दिल्लीला रवाना झाली आहे. एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतलेले सर्व कार्यकर्ते यापूर्वी बंदी घातलेल्या संघटनेचे कार्यकर्ते होते.

सिमीवर बंदी घातल्यानंतर हे लोक पीएफआयमध्ये सामील झाले होते. प्रदेशाध्यक्ष अब्दुल करीम बेकरीवाला याचा बेकरीचा मोठा व्यवसाय आहे. बेकरी व्यवसायाच्या आड तो पीएफआयसाठी निधीचे काम करायचे. तसेच अब्दुल जावेद आणि रफिक हे छोटा-मोठा व्यवसाय करुन पीएफआयच्या फंडिंगचे काम करायचे.

11 महिला अधिकाऱ्यांसह 20 जणांचे पथक

इंदूरमधील कारवाईमध्ये एनआयएचे 20 हून अधिक अधिकाऱ्यांचा सहभाग होता. यामध्ये 10 ते 11 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. दुपारी 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पीएफआयचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क घेतल्या आहेत.