Bihar IT Raid : आयकर विभागाला ‘चुना’ लावला; बिहारमध्ये पानमसाला उद्योजकांवर आयटीच्या धाडी

| Updated on: Aug 03, 2022 | 3:57 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून सिंडिकेटमधील पान मसाला आणि जर्दा व्यापाऱ्यांच्या रोख रकमेच्या व्यवहारावर आणि हालचालींवर आयकर विभाग लक्ष ठेवून होते. हे सर्व व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर होते.

Bihar IT Raid : आयकर विभागाला चुना लावला; बिहारमध्ये पानमसाला उद्योजकांवर आयटीच्या धाडी
नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष पक्षाच्या अध्यक्षावर छापेमारी
Image Credit source: social
Follow us on

बिहार : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये आयकर विभागा (Income Tax)च्या चार पथकांनी शहरातील तीन मोठ्या पानमसाला (Pan Masala) व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे (Raid) टाकले. आयकर विभागाच्या छाप्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाची चार पथके व्यावसायिकांच्या घरांवर आणि गोदामांवर छापे टाकण्यासाठी बुधवारी सकाळीच पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार, टीम मुझफ्फरपूर येथील गुटखा व्यावसायिक प्रदीप कुमार शर्मा यांच्या घरावर छापा टाकत आहे. काझी मोहम्मदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील माली टोला येथे प्रदीप कुमार शर्मा यांचे घर आहे. याशिवाय शहरातील कृष्णा टॉकीजसमोरील गल्लीतील राजेश अग्रवाल उर्फ ​​बाबूभाई आणि छोटी कल्याणी येथील ग्रीन केसरी आणि दिलीप केसरी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही आयकर पथक छापे टाकत आहे.

पहाटे आयकर विभागाचे पथक व्यावसायिकांच्या घरी पोहचले

इन्कम टॅक्सचे पथक सकाळी 6 च्या सुमारास एकाच वेळी सुमारे 30 वाहनांतून व्यावसायिकांच्या विविध ठिकाणी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. आयकर विभागवाले पहाटेच छापा मारण्यासाठी पोहोचले होते. पान मसाला व्यावसायिक जेव्हा सकाळी उठले तेव्हा त्यांना त्यांच्या घरात आयकर अधिकारी आल्याचे दिसले.

पानमसाला व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर होते

गेल्या अनेक महिन्यांपासून सिंडिकेटमधील पान मसाला आणि जर्दा व्यापाऱ्यांच्या रोख रकमेच्या व्यवहारावर आणि हालचालींवर आयकर विभाग लक्ष ठेवून होते. हे सर्व व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर होते. पान मसाला व्यापारी रिअल इस्टेट व्यवसायात आपली रोख रक्कम गुंतवत असल्याचे आयकर विभागाच्या प्राथमिक तपासात आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

छाप्यात अनेक कागदपत्रे जप्त

प्रदीर्घ काळ आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण केल्यानंतर बुधवारी प्राप्तिकर पथकाने पान मसाला व्यापाऱ्यांच्या घरावर, दुकानावर आणि गोदामावर एकत्र छापे टाकले. पथकाने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या कागदपत्रांबाबत आणि कारवाईबाबत प्राप्तिकर विभागाचे पथक अद्याप कोणतीही माहिती देत ​​नाही. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकासह मोठ्या संख्येने पोलिस दलही हजर होते. (IT raids three Panmasala entrepreneurs in Muzaffarpur Bihar)