VIDEO : मुक्ताईनगरात पोलिसांकडून गुंडांची धिंड, नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी पोलिसांचं अभियान

जळगावातील (Jalgaon) मुक्ताईनगरात (Muktainagar) नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी पोलिसांनी गुंडांची धिंड काढली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून हे अभियान चालवण्यात आलं आहे. मुक्ताईनगरातील कुऱ्हा येथील घटना आहे.

VIDEO : मुक्ताईनगरात पोलिसांकडून गुंडांची धिंड, नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी पोलिसांचं अभियान
मुक्ताईनगरात पोलिसांकडून गुंडांची धिंड
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 12:13 PM

जळगाव : जळगावातील (Jalgaon) मुक्ताईनगरात (Muktainagar) नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी पोलिसांनी गुंडांची धिंड काढली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून हे अभियान चालवण्यात आलं आहे. मुक्ताईनगरातील कुऱ्हा येथील घटना आहे.

पोलिसांकडून गुंडांची धिंड

गुंड प्रवृत्तीची नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी कुऱ्हा परिसरात पोलिसांकडून गुंडांची धिंड काढण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील नागरिकांच्या मनातील गुंड प्रवृत्तीच्या दहशत कमी करण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी राहुल खताळ यांनी माजी सैनिकांच्या खुनातील आरोपींची धिंड काढली. ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून खुनातील आरोपींची गावातून धिंड अभियान राबवले जात आहे.

पाहा व्हिडीओ –

जळगावातून 1500 किलो गांजा जप्त

राज्यात सध्या ड्रग्ज (Drugs) विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान आता मुंबई (Mumbai) एनसीबीच्या (NCB) पथकाने जळगावात (Jalgaon) एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता.

महाराष्ट्रासह मुबंईत सध्या मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान, एनसीबीने अनेक ड्रग्ज पॅडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, बॉलिवूडशी संबंधित अनेकांवरही एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील ड्रग्ज पॅडलर्समध्ये धाकधूक वाढली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : ‘मुळशी पॅटर्न’सारखं पुण्यात पोलिसांकडून कुख्यात गुंडांची धिंड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO | गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पुण्यात पोलिसांकडून धिंड?