VIDEO : ‘मुळशी पॅटर्न’सारखं पुण्यात पोलिसांकडून कुख्यात गुंडांची धिंड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO : 'मुळशी पॅटर्न'सारखं पुण्यात पोलिसांकडून कुख्यात गुंडांची धिंड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
'मुळशी पॅटर्न'सारखं पुण्यात पोलिसांकडून कुख्यात गुंडांची धिंड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात मोक्का लावलेल्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय (Pune police took out goons in Pimpri Chinchwad area).

चेतन पाटील

|

May 20, 2021 | 10:02 PM

पुणे : तुम्ही ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट बघितला असेलच. त्या चित्रपटात पोलीस नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंडांची धिंड काढल्याचं दाखवलं होतं. अगदी तशीच काहीशी घटना पुण्यात खरंच घडल्याची चर्चा आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात मोक्का लावलेल्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय (Pune police took out goons in Pimpri Chinchwad area).

आरोपींची परिसरात मोठी दहशत

सुरेश उर्फ बॉबी यादव आणि कल्पेश पवार अशी आरोपींची नावं आहेत. हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल माजवणे, शस्त्र बाळगणे असे 13 गुन्हे बॉबीवर तर 3 गुन्हे कल्पेशवर दाखल आहेत. हे आरोपी ज्या परिसरात राहतात आहेत त्या परिसरात त्यांनी मोठी दहशत निर्माण केली होती. म्हणून तिथल्या नागरिकांसमोर या दोघांची वऱ्हात काढून, दहशत कमी करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी धिंड काढली नसून तपासासाठी घटनास्थळी आरोपींना घेऊन गेल्याचं म्हटलंय. पण परिसरात आरोपींची धिंड काढली अशी चर्चा आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत चार ते पाच पोलीस एका गलीत दोन्ही आरोपींना घेऊन फिरत आहेत. लॉकडाऊनमुळे गल्ली सामसूम आहे. मात्र, कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार अचूकपणे टिपण्यात आला आहे (Pune police took out goons in Pimpri Chinchwad area).

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : संतापजनक ! बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी आख्ख्या गावात धींड काढली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें