रात्रीच्या अंधारात प्रियकर-प्रेयसी घरातून पळाले, सकाळी अल्पवयीन तरुण सापडला मृतावस्थेत

प्रेमी युगुल रात्रीच्या वेळेस घरातून पळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच नातेवाईकांकडून मुलगा आणि मुलीचा शोध सुरू होता, त्यानंतर सकाळी तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत लपलेली आढळून आली.

रात्रीच्या अंधारात प्रियकर-प्रेयसी घरातून पळाले, सकाळी अल्पवयीन तरुण सापडला मृतावस्थेत
प्रेम प्रकरणातून अल्पवयीन तरुणाची हत्या
Image Credit source: टीव्ही 9
| Updated on: May 08, 2022 | 9:45 AM

रांची : झारखंडमधील गढवा जिल्ह्यात (Jharkhand Crime News) प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन तरुणाची हत्या करण्यात (Minor Youth Murder) आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बर्दिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जत्रो बंजारी गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात प्रियकर-प्रेयसी घरातून पळाले होते. त्यानंतर रामा आश्रय राजवार यांच्या 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. संबंधित अल्पवयीन तरुण आणि त्याच गावातील मुलगी दोघेही रात्रीपासून घरी नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणी भेदरलेल्या अवस्थेत लपून बसलेली आढळली, तर तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

काय आहे प्रकरण?

प्रेमी युगुल रात्रीच्या वेळेस घरातून पळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच नातेवाईकांकडून मुलगा आणि मुलीचा शोध सुरू होता, त्यानंतर सकाळी तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत लपलेली आढळून आली. त्यानंतर तरुणाचा शोध सुरुच होता. गावाजवळच्या जंगलात लोकांना एक मृतदेह दिसला.

मृतदेह सापडल्याची बातमी आगीसारखी पसरली आणि हजारो ग्रामस्थांची गर्दी झाली. त्यानंतर लोकांनी याची माहिती बर्दिहा पोलिस स्टेशनचे प्रभारी पंकज कुमार तिवारी यांना दिली. माहिती मिळताच बर्दिहा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. घटनेची माहिती मिळताच माझियाचे पोलिस निरीक्षक संजय कुमार हेही घटनास्थळी पोहोचले.

मृतदेहावरुन तरुणाला बेदम मारहाण झाल्याचे दिसून येत होते. या संदर्भात एसएचओ पंकज कुमार तिवारी यांनी सांगितले की, जत्रा बंजारी येथील सुनील राजवार आणि संजय राजवार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गढवा येथे पाठवण्यात येणार आहे.