सॉरी बाबा, सासरी येऊन चुकले, रडत-रडत व्हिडीओ रेकॉर्ड, विवाहितेची आत्महत्या

| Updated on: May 21, 2021 | 2:54 PM

"बाबा, मी सुसाईड करत आहे. पुन्हा सासरी येऊन खूप मोठी चूक केली" असं कोमल व्हिडीओमध्ये म्हणाल्याची माहिती आहे (Jharkhand Married Lady Suicide Video)

सॉरी बाबा, सासरी येऊन चुकले, रडत-रडत व्हिडीओ रेकॉर्ड, विवाहितेची आत्महत्या
झारखंडमधील महिलेचा आत्महत्येपूर्वी व्हिडीओ
Follow us on

रांची : रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. पती आणि सासरच्या मंडळींनी आपला हुंड्यासाठी जाच केल्याचा आरोप तिने व्हिडीओत केला आहे. (Jharkhand Married Lady Komal Patel commits Suicide record Video as Suicide Note)

झारखंडमधील धनबाद शहरातील धनसार भागात महावीर नगरमध्ये ही घटना घडली. रेल्वे कर्मचारी आलोक प्रसाद याची 21 वर्षीय पत्नी कोमल पटेल हिने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कोमलने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यात रडत-रडतच तिने आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.

काय म्हणाली कोमल?

“बाबा, मी सुसाईड करत आहे. पुन्हा सासरी येऊन खूप मोठी चूक केली. सॉरी पापा, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. मला वाटलं माझा नवरा सुधारला असेल. पण त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे” असं ती व्हिडीओमध्ये म्हणाली.

कोमलच्या कुटुंबीयांची बिकट अवस्था

शवविच्छेदन केल्यानंतर कोमलचं पार्थिव तिच्या माहेरी नेण्यात आलं. त्यावेळी माहेरच्या मंडळींची रडून रडून बिकट अवस्था झाली. कोमलचा पती आलोक आणि त्याच्या कुटुंबीयांना शिक्षा व्हावी, अशी मागणी कोमलची आई आणि बहीण ओरडून ओरडून करत होत्या. जस्टिस फॉर कोमल असं लिहिलेले फलक कोमलच्या नातेवाईकांनी हातात धरले होते.

सासरच्या चौघांविरोधात पोलिसात तक्रार

कोमलचे वडील उमेश प्रसाद यांनी तिचा पती आलोक प्रसाद, सासू, नणंद आणि नणंदेचा नवरा अशा सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. कोमलचा हुंड्यासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. सासरची माणसं कोमलकडे गाडी मागत होते, असंही ते म्हणाले. कोमलच्या आत्महत्येनंतर आलोक कुटुंबासह पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

दहा लाखांसह दागिने हुंड्यात दिले

धनबादमध्ये राहणारा आरोपी आलोक कुमार हा ग्रुप डी रेल्वे कर्मचारी आहे. 2018 मध्ये कोमल आणि आलोक यांचा विवाह झाला होता. लग्नात घरातील सामानासह दागिने आणि दहा लाख रुपये कोमलच्या वडिलांनी तिच्या सासरच्या माणसांना दिले होते. मात्र त्यानंतरही हुंड्यासाठी तिला मारहाण सुरुच होती. आता तर तिच्याकडे कार आणण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता.

संबंधित बातम्या :

दोन चिमुरड्यांना खाडीत सोडून आई गेली कुठे? डोंबिवलीतील मन हेलावून टाकणारी घटना

Ayesha Khan Suicide | ‘दुआओं में याद रखना’, नवऱ्याला व्हिडीओ पाठवला, नदीत उडी घेत विवाहितेची आत्महत्या

(Jharkhand Married Lady Komal Patel commits Suicide record Video as Suicide Note)