रात्री बॉयफ्रेंडसह केली न्यू ईअरची पार्टी, सकाळी बेडखाली सापडली तिचीच डेडबॉडी..
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एका तरूणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. आदल्या रात्रीच तिने बॉयफ्रेंडसोबत न्यू ईअरची पार्टी केली. पण सकाळी मात्र बेडखाली तिची डेडबॉडी सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला

रांची | 4 जानेवारी 2024 : झारखंडच्या दुमकामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तेथे एका तरूणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. आदल्या रात्रीच तिने बॉयफ्रेंडसोबत न्यू ईअरची पार्टी केली. पण सकाळी मात्र बेडखाली तिची डेडबॉडी सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणात त्या तरूणीच्या बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप लावण्यात आला असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, दुमका येथील काठीकुंडच्या चंद्रपुरा येथे ३३ वर्षांची ही तरूणी बांधपाडा भागात एका घरात भाड्याने रहात होती. णी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ती बॉयफ्रेंड चीकूसोबत पार्टी करत होती. पण सकाळी एकच कल्लोळ माजला. कारण त्या तरूणीचा मृतदेह बेडच्याखाली सापडला.
त्या तरूणीच्या मैत्रिणीने तिला बेडखाली पडलेलं पाहिल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडला जाब विचारला. तेव्हा तो म्हणाला की रात्री (मद्यपान) जास्त झाल्याने तिची तब्येत खराब झाली आहे. त्यामुळेच ती अशी (जमीनीवर) पडली आहे. त्यानंतर तो तिथून निघून गेला.
मैत्रिणीने केला उठवायचा प्रयत्न पण..
त्यानंतर त्या मैत्रिणीने तिला हलवलं, उठवायचा प्रयत्नही केला पण त्या तरूणीने काहीच हालचाल केली नाही. तिचा मृत्यू झाला होता. हे पाहून तिची मैत्रीण हादरलीच. तिने लगेचच तिच्या कुटुंबियांना फोन केला तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. या घटनेसंदर्भात समजताच पोलिस तातडीने तघटनास्थळी दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीसह त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी त्या रूममधून मद्याचा ग्लास जप्त केला, तसेच अनेक फिंगरप्रिंट्सही घेतले.
या घटनेपूर्वी त्या तरूणीने इतर दोन तरुणांसोबत पार्टी केली होती. यानंतर तेथे मो. अख्तर ऊर्फ चिकू तिथे आला. इतर तरुणांसोबत पार्टी करण्यावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले. मात्र त्यानंतर मो. अख्तर उर्फ चिकूने तिच्यासोबत पार्टी केली. सकाळी साडेआठला जेव्हा त्याने रूमचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला ती तरूणी मृतावस्थेत सापडली. दुमका एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विद्यार्थिनीच्या प्रियकरासह चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडेल.
मैत्रिणीचं म्हणणं काय ?
मृता तरूणीच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, तिचा प्रियकर रात्री नववर्षाच्या पार्टीसाठी विद्यार्थिनीसोबत आला होता. याआधी दोन तरुण तेथे पार्टी करत होते, मात्र चिकू येताच ते निघून गेले. यानंतर मृत तरूणी आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यात वादावादी झाली. तिचा बॉयफ्रेंड चिकूने, तिला मारहाणही केली. सकाळी उठले आणि पाहिलं तर काय तिचा मृतदेह बेडखाली सापडला. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनीही हत्येचा संशय व्यक्त केला असून पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.
