बेरोजगारांना आधी पार्टटाईम काम मिळवून देतात, मग ‘असा’ घालतात गंडा

| Updated on: Mar 24, 2023 | 2:38 PM

बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तरुण नोकरी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जाचाही मार्ग अवलंबत आहेत. परंतु सायबर गुन्हेगार तरुणांच्या याच परिस्थितीचा फायदा घेत फसवणूक करताना दिसत आहे.

बेरोजगारांना आधी पार्टटाईम काम मिळवून देतात, मग असा घालतात गंडा
बेरोजगार तरुणांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर / गजानन उमाटे : नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना फसवणाऱ्या सायबर टोळ्या सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांकडून नागपूरसह विदर्भातील अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. अशा टोळ्यांपासून बेरोजगार तरुणांनी सावध राहण्याचे आवाहन नागपूर सायबर पोलिसांनी केले आहे. अशीच एक घटना आज नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. तरुणांना आधी पार्टटाईम जॉबचं आमिष दाखवत जाळ्यात ओढायचे, मग पैसे घेऊन फसवणूक करण्यात येत होती. याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या तरुणांना हेरतात

नोकरी किंवा पार्टटाईन जॅाबच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून नागपूरसह विदर्भातील अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात ॲानलाईन अर्ज करतात किंवा संबंधित ॲप डाऊनलोड करतात. यातूनच सायबर गुन्हेगारांकडे तरुणांचा नंबर जातो. मग त्या नंबरवर बेरोजगार तरुणांना फोन येतो. ॲानलाईन पार्टटाईम जॅाब करण्यास सांगितलं जातं. सुरुवातीला मोबदला दिला जातो. नंतर मात्र बेरोजगार तरुणांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जाते.

नागपूर सायबर पोलिसांकडे अशा तक्रारी दाखल झाल्या असून, सायबर गुन्हेगारांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. अशा प्रकारे बेरोजगार तरुणांची फसवणुक करणाऱ्या अनेक टोळ्या सध्या सक्रिय आहे. त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात नोकरीचे आमिष देत 3 हजार तरुणांना गंडा

पुण्यातही उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. जवळपास 3 हजार विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना गंडवले. मोठ्या पगाराचे आमिश दाखवून लाखो रुपयांची वसुली केली. प्लेसमेंटच्या नावाखाली खासगी कंपन्या आणि एजंटांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. बंडगार्डन पोलिसांमध्ये विद्यार्थ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.