
जोधपूरमध्ये लग्न होऊन गेलेल्या बिहारच्या नवरीने मोठा गोंधळ घातला. तिने प्रथम पैसे घेऊन एका तरुणाशी लग्न केले. सुहागरातच्या दोन दिवसांनंतर जेव्हा नवऱ्याला तिचे रहस्य कळले, तेव्हा नवरीने त्याला खोलीत कोंडले. ती तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. नवरीने साडीची दोरी बनवली, ती बाल्कनीला बांधली आणि त्या दोरीच्या साहाय्याने उडी मारली, पण तिचे दोन्ही पाय मोडले. अशा प्रकारे ही चतुर नवरी पोलिसांच्या हाती लागली. रुग्णालयात तिने पोलिसांना तिच्या संपूर्ण टोळीविषयी सांगितले, जी लग्नाच्या नावाखाली भोळ्या, साध्या सरळ लोकांची फसवणूक करते.
प्रकरण बनाड पोलीस ठाण्याचे
येथे भरत नावाच्या तरुणाने लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने २३ वर्षीय लुटेरी नवरी सुमनसह ६ जणांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडित भरतने अहवालात सांगितले की, माझे लग्न होत नव्हते. तेव्हा माझ्या वडिलांचे परिचित नंदकिशोर सोनी यांनी २७ जून रोजी फोनवर चांगल्या मुलीशी लग्न जमवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी बिहारच्या २३ वर्षीय मुलीशी माझे लग्न ठरवले. त्यांचे दोन परिचित संदीप शर्मा आणि रवी नावाचे तरुण दोन मुलींना घेऊन आले होते. एकीचे नाव सुमन आणि दुसरीचे नाव रूबी पांडेय असे सांगितले गेले. आम्हाला सुमन आवडली होती. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, या लग्नासाठी तुम्हाला तीन लाख रुपये द्यावे लागतील, कारण या लग्नाचा इतका खर्च येणार आहे.
वाचा: माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय आणि…; चर्चांवर अखेर सोनाली कुलकर्णीनं सोडलं मौन
३ लाखांत झाला लग्नाचा व्यवहार
भरत म्हणाला, आम्ही १ लाख ७० हजार रुपये रोख आणि १ लाख ३० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर माझे सुमनशी आर्य समाज मंदिरात लग्न झाले. पण दोन दिवसांनंतर मला सुमनचे खरे रूप कळले की ती एक लुटणारी नवरी आहे. यावरून आमच्यात वाद झाला. तेव्हा सुमनने मला खोलीत कोंडले. तिने साडीची दोरी बनवली आणि बाल्कनीतून उडी मारली, तेव्हा तिचे पाय मोडले. रवी आणि संदीप तिथे तिला घेण्यासाठी खाली उभे होते. मी आरडाओरड केली, तेव्हा घरचे जागे झाले. रवी आणि संदीपने सुमनला सोडून पळ काढला, पण माझ्या घरच्यांनी तिला पकडले.
नवरीची चालबाजी कमी झाली नाही
सुमनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण तिथेही तिची चालबाजी कमी झाली नाही. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ती वारंवार तिच्या वडिलांचे नाव बदलत होती. तपास केल्यानंतर असे समजले की ती आधीच विवाहित आहे. लग्नावेळी कोर्ट आणि आर्य समाज मंदिरात तिने दिलेल्या कागदपत्रांमध्ये स्वतःला अविवाहित सांगितले. सर्व कागदपत्रे खोटी दिली. तेव्हा या टोळीचा पर्दाफाश झाला. सुमन पांडेय ही औरंगाबाद, बिहारची रहिवासी आहे. संदीप शर्मा हा कौशांबी, उत्तर प्रदेशचा आहे. रवी आणि रूबी देवी हे डालमिया नगर, रोहतास, बिहारचे रहिवासी आहेत. नंदकिशोर सोनी आणि जितेंद्र सोनी हे जोधपूरचेच आहेत. सध्या इतर सर्व आरोपींचा शोध सुरू आहे.