
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात (KDMC City) अवजड वाहनांमुळे एकीकडे वाहतूक कोंडींची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. कल्याणमध्ये एक असाच एक प्रकार समोर आला आहे. एका दुचाकीला ट्रकने (Kalyan truck accident) कट मारला, त्याचा जाब विचारायला तरुणाने ट्रकचा पाठलाग केला. त्यावेळी ट्रक सापडला मग दोघांच्यात झटापट झाली, पाठलाग करणाऱ्या तरुणाचा टायरखाली येऊन मृत्यू झाला. त्याचवेळी ट्रक चालकाने तिथून पळ काढला असल्याची माहिती कल्याण पोलिसांनी दिली आहे. कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांनी (kalyan market police) याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
संकेत शिर्के (वय 27) अस मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदेश आणि त्याचा मित्र शुभम रोकडे हे दोघे लालचौकी ते स्टेशनरोड असा प्रवास करत होते. यावेळी त्यांची दुचाकी कल्याण स्टेशन कडे जणा-या रोडवर ओक त्रंबकेश्वर बिल्डिंग समोर आली असता आयसर कंपनीच्या एका ट्रकने दुचाकीला कट मारला. याचा राग संदेशला आला, संदेशने या ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली.
संदेशने ओव्हरटेक करुन ट्रक समोर आपली गाडी थांबवली. चालकाच्या बाजूने चढून तो चालकाला मारहाण करू लागला. यावेळी चालकाने घाबरून उजव्या बाजूला जागीच स्टेअरिंग वळवलं. जोराचा हिसडा बसल्यामुळे संदेश पडला आणि टायरखाली आला. या अपघातात संदेशचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बाजरपेठ पोलीस ठाण्यात आयसर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
दुसरी घटना
कल्याण पूर्वेत जुन्या भांडणाच्या रागातून 39 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली आहे. अमोल लोखंडे असे मयत व्यक्तीचे नाव असून रात्री उशिरा चाकूने वार करून हत्या केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी हत्या करणारा जयेश डोईफोडे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात गुन्हेगारी मित्रासह दहशत पसरवणाऱ्या जयेश डोईफोडे नावाच्या आरोपीला मयत नेहमी विरोध करत असल्याच्या रागातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.