AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरीच्या घरी बनवा झटपट स्ट्रीट स्टाईल मोमोज चटणी, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

तुम्हाला जर मोमोज खाताना स्ट्रीट स्टाईल चटणी खायची असेल तेही घरी बनवलेली तर आजच्या लेखात आपण अगदी या सोप्या पद्धतीने मोमो चटणी कशी बनवता येईल ते जाणून घेऊयात.

घरीच्या घरी बनवा झटपट स्ट्रीट स्टाईल मोमोज चटणी, फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
style momos
| Edited By: | Updated on: Mar 12, 2026 | 2:35 PM
Share

मोमोज हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते स्ट्रीट फुड बनले आहेत. मोमोजची खरी चव त्यांच्या मसालेदार, लाल चटणीसोबत येते. बरेच लोकं घरी मोमोज बनवतात मात्र चटणी बाजारातुन विकत आणतात. पण बाजारात मिळणाऱ्या चटणीच्या चव ही योग्य नसते. जर तुम्ही मोमोज प्रेमी असाल आणि घरी स्ट्रीट-स्टाईल मोमो चटणी ट्राय करू इच्छित असाल , तर तुम्ही या स्टेप्सच्या मदतीने ही चविष्ट चटणी बनवू शकता. चला त्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 सुक्या काश्मिरी लाल मिरच्या

2 मोठे टोमॅटो

लसूणच्या 2-3 पाकळ्या

1 चमचा साखर

आल्याचा 1 छोटा तुकडा

1/4 टीस्पून काळी मिरी पावडर

1 चमचा व्हिनेगर

चवीनुसार मीठ

थोडे तेल

चटणी बनवण्याची पद्धत

स्टेप 1: लाल मिरच्या पाण्यात उकळवा

प्रथम एका भांड्यात पाणी गरम करा, त्यात सुकलेल्या लाल मिरच्या टाका आणि 7-8 मिनिटे उकळू द्या. यामुळे मिरच्या मऊ होतील आणि त्या बारीक पेस्ट बनवायला सोप्या होतील.

स्टेप 2: टोमॅटो भाजून घ्या

आता टोमॅटो थोडावेळ पाण्यात उकळवा, किंवा जर तुम्हाला चटणीमध्ये थोडासा स्मोकी चव हवी असेल तर तुम्ही टोमॅटो चुलीवर थोडा वेळ भाजू शकता. यामुळे त्याची चव वाढेल.

स्टेप 3: टोमॅटो आणि मिरच्या थंड होऊ द्या

टोमॅटो आणि लाल मिरच्या उकळल्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाका. दोन्ही घटकांना थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर टोमॅटो सोलून त्यांचे दोन किंवा तीन तुकडे करा.

स्टेप 4: सर्वकाही बारीक करा

चटणी तयार करण्यासाठी पाण्यात उकळलेल्या लाल मिरच्या, चिरलेले टोमॅटो, लसूण, आले आणि इतर सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये एकत्र करा आणि स्मुद होईपर्यंत बारीक वाटा. गरज पडल्यास थोडे पाणी मिक्स करा. परंतु पेस्ट जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

स्टेप 5: चटणी हलकी शिजवा

पेस्टचा कच्चापणा दूर करण्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि तयार प्युरी टाका आणि 2-3 मिनिटे हलके शिजवा.

स्टेप 6: सर्व्ह करा

एकदा चटणी शिजली की, गॅस बंद करा आणि तुमची स्ट्रीट-स्टाईल मोमो चटणी तयार होईल. तुम्ही ही चटणी 4-5 दिवसांपर्यंत हवाबंद डब्यात ठेऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ