
आजकाल मोबाईल, आणि सोशल मीडियामुळे आपलं जग तर विस्तारत चाललं आहे, गऱबसल्या आपण आपल्या देशासह परदेशातील, दूरच्या ठिकाणच्या घडामोडी पाहू शकतो, लांब राहणाऱ्या नातेवाईकांशी, कुटुंबियांशी सहज बोलू शकतो, जग एकाप्रकारे जवळच येत चाललं आहे. मात्र याच जगात माणूसकी नावाचा प्राकर हरवत चालला आहे की काय असा प्रश्न पडावा अशा घटना सध्या घडत आहेत. माणूसकीला काळिमा फासणारी अशीच एक घटना कल्याण शहरात घडलू असून त्यामुळे कल्याणकर अक्षरश: हादरले आहेत.
तिथे अवघ्या 4 वर्षांच्या निरागस मुलीचे अपहरण आणि हत्या झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता, मात्र त्याच प्रकरणी अतिशय भयानक आणि हादरवणारा प्रकार उघड झाला आहे. त्या मुलीच्या मावशीने आणि तिच्या पतीनचे मुलीची हत्या करून गादीत गुंडाळून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. त्यांच्या या भयानक कृत्यामागचं कारण ऐकून तर तुम्ही अवाक् व्हाल.. त्या मुलीची जबाबदारी त्यांनी घेतली पण सांभाळायला कंटाळा आला म्हणून त्यांनी तिचा थेट जीवच घेतला. अपहरण आणि हत्येचा गुन्हा कल्याण कोळेसवाडी पोलिसांनी आठ महिन्यांनंतर उघडकीस आणला आहे. आरोपी मावशी आणि तिच्या पतीला पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली.
सांभाळायचा कंटाळा आला म्हणून मृत्यूच्या दारी ढकललं
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील हे चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना, तिची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह करून त्या मुलीला तशीच सोडून गेली होती. त्यानंतर नातेवाईक असलेली चुलत मावशी अपर्णा कांबरी आणि तिचा पती प्रथमेश कांबरी यांनी मुलीची जबाबदारी घेतली. मात्र अवघ्या चार वर्षांच्यामुलीला “प्रात:विधी” म्हणजेच शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत नियम समजत नाहीत, या कारणावरून वारंवार मारहाण केली जात होती. मारहाणीमध्येच तिचा मृत्यू झाला. हत्या झाल्यानंतर मृतदेह गोणीत ठेवून त्यावर गादी गुंडाळली आणि कर्जत-भिवपुरीतील चिंचवली गावाजवळच्या जंगलात फेकून दिला.
आत्याला आला संशय अन् केली तक्रार
काही दिवसांनी मुलीच्या आत्याने तिला सांभाळण्यासाठी मागणी केली असता आरोपी कांबरी दाम्पत्याने मोबाईल बंद करून पळ काढला. त्यामुळे आत्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अपर्णा व प्रथमेश कांबरी हे दोघेही गेल्या सात-आठ महिन्यांपासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते. मात्र बराच तपास केल्यानंतर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली.
दोन्ही आरोपींना 11 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. जंगलात फेकलेला मृतदेह ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.