कंटेनर चालकाचं कंट्रोल सुटलं, दोन गाड्या चिरडून घरात शिरला, मग मोठ्या आवाजाने गाव हादरलं

कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, सिमेंटचा कंटेनर घरात घुसल्याची घटना घडली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी कंटेनर चालक नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे घटनास्थळी लोकांनी धाव घेतली.

कंटेनर चालकाचं कंट्रोल सुटलं, दोन गाड्या चिरडून घरात शिरला, मग मोठ्या आवाजाने गाव हादरलं
Kalyan nagar highway
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 11, 2023 | 9:06 AM

सुनील जाधव, कल्याण : कल्याण नगर महामार्गावर (kalyan nagar highway) यते गावातील बांधणी पाडा दरम्यान एका घरात भरधाव वेगाने निघालेला सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर (container) घुसल्याने मोठा आपघात घडला. या घटनेत घरातील सगळे बचावले असल्याची माहिती मिळाली आहे. घराचे मोठे नुकसान झाले असून एक चारचाकी व एक दुचाकी चक्काचूर झाली आहे. कंटनेर चालक दारूच्या नशेत होता, भरधाव वेगाने सिमेंट भरून नेणारा कंटनेर निघाला असताना गाडीवरील चालकाचा (container driver) ताबा सुटला हा अपघात झाला आहे. तिथल्या गावकऱ्यांनी त्या परिसरात सुरक्षा भिंतीची मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात अशा पद्धतीचे अपघात होणार नाहीत.

घरातील लोकांचं नशीब चांगलं..

कल्याण नगर महामार्गावर यते गावातील बांधणी पाडा रोडवरती भदाणे कुटूंब राहते. घरात काल दुपारी 12 च्या सुमारास सिमेंट भरून नेणारा कंटनेर अचानक घुसल्याने दोन गाड्या सह घराचे नुकसान केले आहे. घरातील लोकांचं नशीब चांगलं असल्यामुळे यामध्ये कुणालाही इचा झालेली नाही. ट्रक चालक दारुच्या नशेत असल्याचा आरोप केल्यामुळे सुनील भदाणे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. तिथल्या इतर नागरिकांनी सुध्दा अशा सुरक्षा भिंत असावी अशी मागणी केली आहे.

आवाज इतक्या जोरात होता की…

ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी तिथं जोराचा आवाज झाला. आवाज इतक्या जोरात होता की, घरातील आणि परिसरातील लोकं एकदम घाबरुन गेली, घटनास्थळी काही क्षणात मोठ्या प्रमाणात गर्दी गमली. त्यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक सु्द्धा झालं होतं. काही लोकांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिस दाखल झाल्यानंतर तिथं पंचनामा करण्यात आला. त्याचबरोबर चालक आणि मालक यांच्या गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.