AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय घडलं ‘त्या’ खोलीत?, तो शांत झोपला, पुन्हा उठलाच नाही… ती रात्र काळरात्र ठरली

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीनेच पतीचा गळा दाबून आत्महत्येचा बनाव रचल्याचं उघडकीस आलं आहे. पण पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच पाच दिवसानंतर संपूर्ण प्रकारावर पडदा पडला.

काय घडलं 'त्या' खोलीत?, तो शांत झोपला, पुन्हा उठलाच नाही... ती रात्र काळरात्र ठरली
Extra Marital AffairImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2023 | 6:17 AM
Share

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे हृदयाचा काप उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीचा काढा काढल्याची घटना घडली आहे. पतीचा खून करूनच ती थांबली नाही. तर तिने चक्क पतीच्या मृतदेहसोबत झोपून अख्खी रात्र काढली. कुणालाही संशय होऊ नये म्हणून तिने ही शक्कल लढवली. पण कायद्याच्या कचाट्यातून कोणीच सुटत नाही, तसंच तिचं झालं. अखेर ती पोलिसांच्या जाळ्यात आली आणि आता तुरुंगात कर्माची फळं भोगत आहे.

3 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. मथुराच्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने त्याची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पती आपल्या प्रेमाच्या वाटेत अडसर बनला होता. त्यामुळेच तिने पतीलाच मार्गातून कायमचा दूर करण्याचा डाव आखला. तिने प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली. नवऱ्याचा गळा दाबून त्याला ठार मारले. त्यानंतर रात्रभर नवऱ्याच्या मृतदेहासोबत झोपली. सकाळी उठून तिने ही हत्या आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पण पाच दिवसानंतर हत्येचा खुलासा झाला आणि मारेकरी पत्नीचा खेळ खल्लास झाला.

गळ्यात दुपट्टा टाकला

सकाळी उठल्यावर पत्नीने पतीच्या गळ्यात दुपट्टा टाकला. त्याने आत्महत्या केली असं समजावं असा तिचा प्रयत्न होता. पोलिसांनाही संशय होऊ नये म्हणून तिने हा बनाव रचला. त्यानंतर पतीच्या मृत्यूचा धक्का बसल्याचं दाखवण्यासाठी छाती जोरजोरात पिटत ती रडू लागली. पण पहिल्याच दिवशी मृतक व्यक्तीची पत्नी नीतू सैनी (वय 25) च्या हालचाली, बोलणं, वागणं पोलिसांना संदिग्ध वाटलं. तिच्या बोलण्यातही एक वाक्यता नव्हती. त्यामुळेच पोलिसांनी आत्महत्येऐवजी हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोस्टमार्टममधून पोलखोल

मृतदेह पोस्टमार्टमला पाठवलं. त्यानंतर जे कारण समोर आलं त्याने पोलीसही चक्रावून गेले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी नीतूला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच नीतू पोपटा सारखी बोलली. तिने सर्व प्रकार सांगत पोलिसांची गयावया करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांनाही कोर्टासमोर हजर केलं आणि दोघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?