भररस्त्यात तरुणीला प्रियकराकडून मारहाण, मुलीचा आवाज ऐकून दोन तरुण मदतीला गेले, मग…

दोन तरुण शहाड परिसरात मातोश्री कॉलेज जवळून चालले होते. अचानक त्यांना एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. ही मुलगी मदतीसाठी याचना करत होती. तरुण माणुसकीच्या नात्याने तरुणीला मदत करण्यासाठी गेले. पण त्यानंतर ते थेट रुग्णालयातच पोहचले.

भररस्त्यात तरुणीला प्रियकराकडून मारहाण, मुलीचा आवाज ऐकून दोन तरुण मदतीला गेले, मग...
आर्थिक अडचणीला कंटाळलेल्या कामगाराने जीवन संपवले
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 13, 2023 | 3:24 PM

कल्याण / सुनील जाधव : भररस्त्यात अडचणीत असलेल्या तरुणीला मदत करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. तरुणीला मारहाण करायला गेलेल्या दोन तरुणांना टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, मुख्य आरोपी फरार आहे. फरार आरोपीचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. योगेश चौधरी आणि उत्कर्ष सिंग अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

एका तरुणीचे तिच्या प्रियकरासोबत काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले. सदर तरुणी रविवारी कामावरुन घरी चालली होती. यावेळी प्रियकराने तिला रस्त्यात अडवले आणि तरुणीला मारहाण, शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. यावेळी रस्त्यावरुन चाललेले दोन तरुण तरुणीचा आवाज ऐकून मदतीसाठी धावत आले.

तरुणांना आलेले पाहून आरोपी प्रियकराने फोन करुन आपल्या मित्रांना बोलावले. यानंतर तेथे आलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळक्याने या दोघांना मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

खडकपाडा पोलिसांकडून सहा आरोपींना अटक

शहाड परिसरात मातोश्री कॉलेज जवळून रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेचा तपास सुरु करत पोलिसांनी 6 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रणव असे मुख्य आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे.