Kalyan : कल्याण रेल्वे परिसरात हल्लेखोर, चोरांचा सुळसुळाट, रेल्वे यार्डात तरुणावर चाकूहल्ला

| Updated on: Dec 18, 2021 | 3:31 PM

कल्याण, उल्हासनगर रेल्व परिसरात सध्या हल्ल्याच्या आणि लुटीच्या घटना वाढल्या आहेत. कल्याण रेल्वे यार्डमध्ये एका तरुणावर चाकूहल्ला झाला आहे.

Kalyan : कल्याण रेल्वे परिसरात हल्लेखोर, चोरांचा सुळसुळाट, रेल्वे यार्डात तरुणावर चाकूहल्ला
Follow us on

कल्याण : रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या एका मजूराला बेदम मारहाण करुन लूटीचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना कल्याण जीआरपीने ताब्यात घेत तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. कल्याण पूर्व भागातील रेल्वे यार्डात ही घटना घडली होती. कल्याण, उल्हासनगर रेल्व परिसरात सध्या हल्ल्याच्या आणि लुटीच्या घटना वाढल्या आहेत.

रेल्वे यार्डमध्ये तरुणावर चाकूहल्ला

कल्याण पूर्व भागातील रेल्वे यार्डात एक तरुण देवीदास भले हा गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काही काम करीत होता. यावेळी तीन तरुण त्याच्या जवळ आले. या तिघांनी देवीदास याची जबरदस्तीने झाडाझडती सुरु केली. या दरम्यान देवीदासने जोरदार प्रतिकार केला. त्याचा प्रतिकार पाहून हे तिघे आणखीन चिडले. तिघांनी देवीदास याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला जखमी देवीदास याने बचावसाठी आरडाओरडा केला. हे पाहून तिघे पळायला लागले. यातील एका काही नागरीकांनी पकडले. त्याला कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले आहे.

दोनजण ताब्यात, एक आरोपी फरार

याबाबत पोलीस अधिकारी संपत चव्हाण यांनी सांगितले की, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याची विचारपूस केली असता त्यांनी इतरांची नावे सांगितली. सध्या अल्पवयीन आरोपीस भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यातील दुसरा आरोपी सद्दाम शेख याला अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शारदूल यांच्या मार्गदर्शनाखआली संपत चव्हाण हे तपास करीत आहे. या आरोपीनी या आधीही असा काही प्रकार केला आहे का? याची चौकशी सुरु आहे.

उल्हासनगर स्थानकात प्रवाशाचा मोबाईल हिसकावला

शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला धक्का मारुन त्याचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला प्रवासी आणि पोलिसांनी रंगेहात पकडले. आरबाज शेख असे या आरोपीचे नाव असून पुढील तपास कल्याण जीआरपीचे आर. एम. थोरवे करीत आहेत. आरबाज याने या आधी काही गुन्हे अशा प्रकारचे केले आहेत का? याचा तपास जीआरपी पोलीस करीत आहेत.

Murder | वाद छोटा, कांड मोठा! दारुसाठी 20 रुपये दिले नाहीत म्हणून चक्क जीवच घेतला

अर्ध्या किमतीत हेल्थ विमा; आरोग्य विम्याच्या संरक्षणातून बिमारींचा करा सामना

Amit Shah: कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यांचं खासगीकरण नाही, अमित शहांची ग्वाही