
मुंबईतील मीरा रोड पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचे कारण आहे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेला ‘केम छो’ ऑर्केस्ट्रा बार. पोलिसांच्या छाप्यात येथे गुप्त खोल्या आणि अनैतिक गतिविधींचा खुलासा झाला आहे. पोलिस येण्यापूर्वी बारमध्ये अलार्म वाजायचा आणि लाल दिवा लागताच बारमधील वातावरण ‘संस्कारी’ बनायचे. पोलिस तपासात असे समोर आले की, मेकअप रूमच्या मागे रेकॉर्डेड संगीतावर केवळ बारमधील मुली लिप-सिंक करायच्या. इतकेच नाही, तर बारमध्ये एक गुप्त मार्ग होता, ज्यामार्फत एका खोलीत पोहोचता यायचे. पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा तिथे 11 मुली लपलेल्या आढळल्या.
पोलिसही चकित झाले
पोलिसांच्या मते, बारमध्ये 20 ते 25 मुली उपस्थित होत्या, तर नियमानुसार ऑर्केस्ट्रा बारमध्ये फक्त 8 गायक (पुरुष/महिला) असण्याची परवानगी आहे. येथे लाइव्ह गायन होत नव्हते, तर रेकॉर्डेड संगीतावर महिला फक्त ओठ हलवून सादरीकरण करायच्या. बारमध्ये येणाऱ्या उत्साही लोकांना वाटायचे की त्या लाइव्ह गात आहेत. खुलासा झाला की, बारमध्ये अलार्म वाजवून पोलिस येण्याची सूचना दिली जायची आणि मुली एका खोलीत लपवल्या जायच्या. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त निकेत कौशिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या छाप्यामुळे हा बार चर्चेत आला आहे. मात्र, या छापा टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा स्व:त अधिकारी चकित झाले की बाहेरून सामान्य दिसणाऱ्या या मालमत्तेत गुप्त खोल्या बनवल्या होत्या.
वाचा: जर इवांका माझी मुलगी नसती तर… ट्रम्प यांनी कहरच केला, मुलीबद्दल वादगस्त विधान
‘केम छो’ बारला कोणाचे आशीर्वाद?
पोलिसांच्या छाप्यानंतर समोर आले आहे की, एक वर्षापूर्वी 29 जून 2024 रोजी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त संजय काटकर आणि पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी स्व:त उपस्थित राहून हा केम-छो ऑर्केस्ट्रा डान्स बार जमीनदोस्त केला होता. या बिअर बारचे मालक दिनकर हेगडे यांच्याविरुद्ध 12 सप्टेंबर 2024 रोजी काशीमीरा पोलिस ठाण्यात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही, वर्षभरातच हा बिअर बार पुन्हा बेकायदेशीरपणे बांधण्यात आला. स्थानिक लोक विचारत आहेत की, या ऑर्केस्ट्रा बारला कोणाचे संरक्षण मिळाले आहे. केम छो बारमधील अनैतिक गतिविधींचा खुलासा केला होता. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. केम छो ऑर्केस्ट्रा डान्स बार मीरा-भाईंदर पोलिसांच्या काशीमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो.