जर इवांका माझी मुलगी नसती तर… ट्रम्प यांनी कहरच केला, मुलीबद्दल वादगस्त विधान
सध्या सोशल मीडियावर डोनाल्ट ट्रंप यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रंप मुलगी इवांका विषयी वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतीय आयातीवर 50 टक्के शुल्क लादून नवीन व्यापारी तणाव निर्माण केला आहे, त्यांच्या कट्टर “अमेरिका फर्स्ट” धोरणाला दुप्पट जोर दिला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने ट्रंप नाराज आहेत, त्यामुळे हे भारी शुल्क लादले गेले आहे. या बातमीने भारताच्या निर्यात क्षेत्रात खळबळ उडाली असून, उद्योगपती, धोरणकर्ते आणि अर्थतज्ज्ञ अर्थव्यवस्थेबाबत चिंतित आहेत. दरम्यान, डोनाल्ट ट्रंप यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते मुलीविषयी वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जुन्या मुलाखतीतील एक वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी आपली मुलगी इवांका ट्रम्प हिच्याबाबत एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे नेटिझन्समध्ये संतापाची लाट उसळली होती. २००६ मधील ‘द व्ह्यू’ या प्रसिद्ध टॉक शोचा हा जुना भाग असून, ट्रम्प यांच्या अशा विधानांमुळे त्यांची प्रतिमा नेहमीच वादात सापडते.
वाचा: महाभंयकर! ड्रग्जच्या पैशांसाठी अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध.. तरुणीमुळे 19 जणं एचआयवी पॉझिटीव्ह
Flashback
Donald Trump: “If Ivanka weren’t my daughter, perhaps I’d be dating her”
TV host: “Stop it. It’s so weird.” #TrumpIsWeird #TBT pic.twitter.com/JOXOCp27Cp
— Republicans against Trump (@RpsAgainstTrump) August 2, 2024
काय आहे व्हायरल व्हिडीओ?
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ट्रम्प आणि इवांका शोच्या होस्टसोबत बसलेले दिसतात. होस्टने ट्रम्प यांना एक प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिले की, ‘जर इवांका माझी मुलगी नसती, तर मी कदाचित तिला डेट केले असते.’ हे ऐकून इवांकाही हसली, तर होस्ट आणि इतर उपस्थित थक्क झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, लोक त्यावर तीव्र टीका करत आहेत.
प्लेबॉय मॅगझिनबाबतही आक्षेपार्ह टिप्पणी
या शोमध्येच पुढे बोलताना ट्रम्प यांनी इवांका आणि प्लेबॉय मॅगझिनबाबत आणखी काही विवादास्पद मत व्यक्त केले. होस्टने प्रश्न केला की, ‘जर प्लेबॉयने इवांकाला कव्हर पेजवर स्थान दिले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?’, तेव्हा ट्रम्प म्हणाले, ‘ते निराशाजनक ठरेल… पण खरे तर, ते मॅगझिनच्या आतल्या मजकुरावर अवलंबून असेल.’ जेव्हा होस्टने पुन्हा स्पष्ट केले की, जर त्यात नग्न छायाचित्रे नसतील तर काही हरकत नाही का, तेव्हा ट्रम्प म्हणाले, ‘मला वाटत नाही की इवांका असे काही करेल, आणि मी आधीच सांगितले आहे की जर ती माझी मुलगी नसती तर मी तिला डेट केले असते.’
