महाभंयकर! ड्रग्जच्या पैशांसाठी अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध.. तरुणीमुळे 19 जणं एचआयव्ही पॉझिटीव्ह
एक महाभंयकर प्रकरण समोर आले आहे. 17 वर्षांची मुलगी पैशांसाठी वेगवेगळ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवायची. पण या तरुणीमुळे 19 पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली आहे. या मुलीला ड्रग्जचे व्यसन होते. नेमकं काय घडलं जाणून घेऊया...

शरीरसंबंधांवरुन अनेक ठिकाणी हत्या झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, आता एक महाभयंकर प्रकरण समोर आले आहे. एका 17 वर्षीय तरुणीला ड्रग्जचे व्यसन लागले होते. पण ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिने पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली. पण गेल्या दीड वर्षांमध्ये या तरुणीमुळे जवळपास 19 पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. एका तरुणाने थेट सोशल मीडियाचा वापर करत याबाबत माहिती दिली आहे. आता हे प्रकरण कुठे घडले? चला जाणून घेऊया..
उत्तराखंडच्या रामनगर शहरातील हे धक्कादायक प्रकरण आहे. हे प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नैनीताल जिल्ह्यातील गुलरघट्टी परिसरात प्रथम समोर आले. एक 17 वर्षीय मुलगी, जी कथितपणे ड्रग्सच्या व्यसनाधीन होती, तिने गेल्या दीड वर्षात किमान 19 पुरुषांना ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) पसरवला आहे. अहवालानुसार, ही किशोरी अनेक स्थानिक पुरुषांच्या संपर्कात होती आणि त्यापैकी अनेकांना नंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. ती मुलगी तिला मिळालेल्या पैशांचा उपयोग तिच्या ड्रग्सच्या व्यसनासाठी करत होती.
वाचा: 40 वर्षे भीक मागितली! पैसे मोजायला लागले 6 तास, एकूण रक्कम किती झाली हे ऐकून धक्काच बसेल
सोशल मीडियाद्वारे मिळाली माहिती
एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. “नैनीताल, उत्तराखंड येथे 17 वर्षीय मुलीमुळे 19 तरुणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला. ती ड्रग्जच्या आहारी गेली आहे आणि व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी तिने पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले. पुरुषांना माहिती नव्हते की ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. तिने काही विवाहित पुरुषांशीही संबंध ठेवले, ज्यांच्या पत्नींनाही एचआयव्ही झाला आहे” अशी पोस्ट एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर करण्यात आली.
ड्रग्सच्या व्यसनाधीन किशोरीशी संबंधित संसर्ग
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा परिसरातील अनेक तरुणांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. त्यांनी रामदत्त जोशी संयुक्त रुग्णालयातील एकीकृत समुपदेशन आणि चाचणी केंद्रात (ICTC) संपर्क साधला. तिथे त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. तेव्हा त्यांचे रिपोर्स्ट्स एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर झाले. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेने अनेकांना धक्का बसला असला तरी, काही लोकांनी निदर्शनास आणले की त्या पुरुषांनी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले, जे कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.
