AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 वर्षे भीक मागितली! पैसे मोजायला लागले 6 तास, एकूण रक्कम किती झाली हे ऐकून धक्काच बसेल

कर्नाटकच्या रायचूर येथील 60 वर्षीय रंगम्मा नावाच्या महिलेने, जी भीक मागून आपला उदरनिर्वाह करते, तिने अंजनेया मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 1.83 लाख रुपयांचे दान केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून जमा केलेले हे पैसे तिने तीन बोर्‍यांमध्ये ठेवले होते. या दानामुळे रंगम्माची उदारता तर दिसून आलीच, शिवाय समाजात दान देण्याबाबत एक नवा दृष्टिकोनही समोर आला आहे.

40 वर्षे भीक मागितली! पैसे मोजायला लागले 6 तास, एकूण रक्कम किती झाली हे ऐकून धक्काच बसेल
beggarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 08, 2025 | 7:04 PM
Share

कर्नाटकच्या रायचूर येथील 60 वर्षीय रंगम्मा नावाच्या महिलेने, जी भीक मागून आपला उदरनिर्वाह करते, तिने अंजनेया मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून जमा केलेले हे पैसे तिने तीन बोर्‍यांमध्ये ठेवले होते. या दानामुळे रंगम्माची उदारता तर दिसून आलीच, शिवाय समाजात दान देण्याबाबत एक नवा दृष्टिकोनही समोर आला आहे. तिने गेल्या 40 वर्षात जमा केलेले पैसे मोजायला २०हून अधिक लोकांना सहा तास लागले आहेत. 

दान करण्यासाठी श्रीमंत असणे गरजेचे नाही. तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात हे महत्त्वाचे आहे. होय, तुम्ही अशा उदाहरणांचा रोजच्या जीवनात बर्‍याचदा ऐकले असेल, पण कर्नाटकच्या रायचूर येथील 60 वर्षीय महिलेने हे खरे करून दाखवले आहे. ही महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. पण तिने आपल्या कठीण काळासाठी जपून ठेवलेली रक्कम दान केली आहे. एका भिकारी महिलेने दान केलेली रक्कम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय, तिने हजार-दोन हजार नव्हे, तर तब्बल 1.83 लाख रुपये दान केले आहेत.

वाचा: मुकेश अंबानी यांना किती पगार मिळतो? सत्य जाणून तुम्ही थक्क व्हाल

60 वर्षीय रंगम्माने भीक मागून पैसे गोळा केले होते. तिने दान देणार्‍यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. रायचूरच्या बिजनगरा तालुक्यात अंजनेया मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे, ज्यासाठी तिने ही रक्कम दान केली आहे. रंगम्माच्या या दानाबद्दल ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत. रंगम्मा गेल्या सुमारे 40 वर्षांपासून भीक मागून पैसे जमा करत होती. तिने हे पैसे तीन बोर्‍यांमध्ये ठेवले होते. या चिल्लर पैशांना मोजण्यासाठी 20 हून अधिक लोकांना 6 तास लागले.

40 वर्षांपूर्वी आली होती गावात

रंगम्मा सुमारे 40 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून बिजनगरा गावात आली होती. गावकरी सांगतात की, तेव्हापासून आजपर्यंत रंगम्मा भीक मागत आहे. जेव्हा रंगम्माच्या नोटा मोजायला सुरुवात झाली, तेव्हा समजले की तिचे सुमारे 20 हजार रुपये खराब झाले होते. यापूर्वी रंगम्माने गावकऱ्यांच्या मदतीने भीक मागून जमा केलेल्या सुमारे 1 लाख रुपयांमधून एक घर बांधले होते. रंगम्माने सांगितले की, तिने जे दान दिले आहे, त्यामुळे तिला खूप आनंद होत आहे.

गावकऱ्यांनी विचारले तेव्हा सांगितली खास गोष्ट

गावकऱ्यांनी रंगम्माच्या पेटी आणि गाठोड्यांमध्ये ठेवलेले पैसे पाहिले होते. त्यानंतर तिने सांगितले की, ती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान करू इच्छिते. यानंतर गावकऱ्यांसमोर ती एक महान दानवीर ठरली.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच