पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे… नेमकं प्रकरण काय?
E20 इंधनाच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आम आदमी पार्टीने या धोरणाविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या E20 इंधन धोरणात तीन महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या मागण्यांसाठी दोन लाखांहून अधिक नागरिकांनी डिजिटल स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काही वाहनचालक E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा करत आहेत. तसेच मायलेज कमी होत असल्याचीही तक्रार केली जात आहे. दुसरीकडे, सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत.
यापूर्वी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. आता E20 इंधनाच्या प्रश्नावरून पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू झाल्याने केंद्र सरकारची चिंता वाढणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Aug 02, 2026 11:07 AM
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स