बायकोला मारून खोल दरीत फेकलं, मोबाईलही पाण्यात फेकला! ईराणी तरुणीसोबत… कसा पकडला आरोपी? पोलिसांचा घामटा काढणारं प्रकरण काय?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात नवऱ्याने बायकोचा खून केला. त्यानंतर त्याने जे शक्कल लढवली ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला जाणून घेऊया पोलिसांचा घामटा काढणारे हे प्रकरण काय आहे...

बायकोला मारून खोल दरीत फेकलं, मोबाईलही पाण्यात फेकला! ईराणी तरुणीसोबत... कसा पकडला आरोपी? पोलिसांचा घामटा काढणारं प्रकरण काय?
Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 10, 2025 | 1:02 PM

नवरा-बायकोचे नाते हे अतिशय सुंदर असते. कधी प्रेम तर कधी भांडणे, तसेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढउताराला ते एकत्र धीराने समोरे जातात. मात्र, याच नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर त्याने बायकोच्या मृतदेहाची ज्या प्रकारे विलेवाट लावली ते पाहून पोलिसांनाही घाम फुटला. आता नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया..

केरळमधील कोट्टायमच्या शांत खोऱ्यात एक भयानक कट रचला गेला, ज्याने सुंदर नात्यावरच घाव घालण्यात आला. कोट्टायममध्ये रचली गेलेली एक भयंकर कहाणी, ज्यामध्ये प्रेमाच्या जागी आता फक्त भयावह घटनेची दहशत आहे. खरेतर, वेगळे राहणाऱ्या ५९ वर्षीय टेक्नोलॉजी एक्सपर्ट सॅम जॉर्ज याने आपल्या पत्नी जेसीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचा मृतदेह खोल खड्ड्यात फेकून दिला. पोलिसांच्या मते, हा एक नियोजित खून होता.

वाचा: एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, बाळासाहेबांनी मिटवलेलं प्रकरण काय?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे प्रकरण २६ सप्टेंबरचे आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात एक खळबळजनक खुनाची घटना घडली. आरोपी सॅम जॉर्ज (वय ५९) याने २६ सप्टेंबरच्या रात्री आपली पत्नी जेसी सॅम (वय ५०) हिचा घरातच गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह आपल्या कारच्या डिक्कीत ठेवला आणि रात्री १ वाजता तो ६० किलोमीटर दूर एका खोल खड्ड्यात फेकून दिला. खुनाचा पुरावा लपवण्यासाठी सॅमने जेसीचा मोबाइल फोनही खोल पाण्यात फेकून दिला.

सॅमची इराणी महिलेशी मैत्री

सॅमला एका इराणी महिला मैत्रिणीसोबत पाहिले गेले, जी एमजी विद्यापीठात योगाचे शिक्षण घेत आहे. असे सांगितले जाते की, सॅमने केवळ त्या इराणी मुलीशी मैत्री केली नाही, तर तिला एमजी विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदतही केली. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या इराणी मैत्रिणीला या योजनेबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिने या प्रकरणाच्या तथ्यांची पुष्टी करण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे मोबाइल पुरावे देखील दिले.

आरोपीने गुन्हा कबूल केला

जेसीचा मृतदेह शुक्रवारी सापडला आणि सॅमला ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांच्या कठीण शोधानंतर मंगळवारी खोल पाण्यातून मोबाइल फोन शोधून काढला. पोलिसांच्या चौकशीत सॅमने आपला गुन्हा कबूल केला. सॅमला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.