Kolhapur Suicide : बापरे! DP ठेवला नाही म्हणून मारहाण, गळफास घेत अल्पवयीन तरुणीची आत्महत्या

| Updated on: Apr 29, 2022 | 8:35 AM

कोल्हापुरातील आजरा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली आहे.

Kolhapur Suicide : बापरे! DP ठेवला नाही म्हणून मारहाण, गळफास घेत अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
तरुणीची आत्महत्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur crime news) एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणीनं आत्महत्या केलीय. या तरुणीच्या आत्महत्येचं (Suicide) कारण खळबळजनक आहे. डिपी ठेवला नाही म्हणून एका तरुणानं या मुलीला मारहाण केली होती. त्यानंतर नैराश्य आलेल्या तरुणीनं गळफास घेत जीव दिलाय. या घटनेनं कोल्हापुरात एकच खळबळ उडालीये. सविता खामकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. कोल्हापुरातील आजरा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या मुलीला आजरा बस स्थानक परिसरात मारहाण करण्यात आली होती. डीपी ठेवला नाही, म्हणून या तरुणीला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यानंतर निराश झालेल्या या तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणारी ही तरुणी अल्पवयीन (Minor girl suicide) असल्याचीही माहिती समोर आली आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

कुणी केली मारहाण?

अल्पवयीन मुलीनं केलेल्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अल्पवयीन मुली मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. किशोर सुरंगी या तरुणाविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

किशोर सुरंगी या तरुणानेच सविताला आजरा बस स्थानक परिसरात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. डीपी ठेवला नाही, म्हणून किशोरने सविताला मारहाण केली होती, असं सांगितलं जातंय. त्यानंतर निराश झालेल्या सवितानं गळफास घेत आत्महत्या केली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आत्महत्यांची चिंताजनक आकडेवारी

दरम्यान कोल्हापुरात आत्महत्या होण्याचं प्रमाण चिंताजनक आहे. एकट्या मार्च महिन्यात 38 जणांनी आत्महत्या केली. तर 1 ते 24 एप्रिलदरम्यान, 27 जणांनी आपलं आयुष्य संपवलंय. यात अल्पवयीन आणि तरुण मुलांच्या आत्महत्येच्या घटना काळजी वाढवणाऱ्या आहेत. क्षुल्लक कारणासह, आर्थिक अडचणी आणि कौटुबिक ताणतणावातून आत्महत्या होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयात विष प्राशन केलेल्यांची संख्याही दररोज दहा ते बाराच्या प्रमाणात आहे.