AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती-पत्नीमध्ये पैशावरुन वाद झाला, मग पत्नीने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावले !

पती-पत्नीमध्ये नेहमी पैशावरुन वाद व्हायचे. एक दिवस हा वाद विकोपाला गेला. मग जे घडलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

पती-पत्नीमध्ये पैशावरुन वाद झाला, मग पत्नीने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावले !
पैशाच्या वादातून पत्नीने पतीचे गुप्तांग कापले
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 04, 2023 | 12:54 PM
Share

कोलकाता : पती-पत्नीमध्ये नेहमी छोट्या-मोठ्या कारणातून वाद होत असतात. कधी हे वाद सामोपचाराने मिटतात, तर कधी कधी भयंकर वळण घेतात. अशीच एक भयंकर घटना पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये दररोज पैशावरुन वाद व्हायचे. हे वाद विकोपाला गेले अन् जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. पती-पत्नीमध्ये नेहमीप्रमाणे वाद सुरु होता. वाद वाढत गेला आणि संतापलेल्या पत्नीने धारदार वस्तू घेतली आणि थेट पतीचे गुप्तांगच कापले. मुर्शिदाबाद परिसरात ही घटना घडली. नुरुल इस्लाम आणि नर्गिस परवीन अशी पती-पत्नीची नावे आहेत. पतीला गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पैशावरुन पती-पत्नीमध्ये दररोज वाद व्हायचे

महिलेच्या या कृत्यामुळे कुटुंबीयही हैराण झाले आहेत. क्षुल्लक कारणातून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांनी महिलेला शिक्षेची मागणी केली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरातही एकच खळबळ माजली आहे. पती-पत्नीमध्ये लग्न झाल्यापासूनच पैशावरुन रोज वाद व्हायचे. मात्र या वादाचा असा भयानक अंत होईल असे स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल.

आरोपी पत्नीला पोलिसांकडून अटक

सोमवारी सकाळी नुरुल कामावरुन घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरु झाला. वाद वाढत गेला आणि पत्नीला संताप अनावर झाला. संतापाच्या भरात तिने चाकू घेतला आणि पतीचे गुप्तांगच कापले. नुरुल घरच्यांनी तात्काळ कांदी उपजिल्हा रुग्णालयात नेले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान