नवरीने दगा दिल्यानंतर त्याच मंडपात दुसरीशी लग्न, मधुचंद्रानंतर जिने दगा दिला तिच्यासोबत नवरा फरार

"तू माझ्या मुलाशी लग्न कर. आमची अब्रू वाचेल. आम्ही हुंडावैगेर काही नको" सगळ्याच म्हणण ऐकून सोनम नामदेव त्याच मंडपात लग्नाला तयार झाली. तिने त्याच मांडवात रोहित नामदेवसोबत लग्न केलं.

नवरीने दगा दिल्यानंतर त्याच मंडपात दुसरीशी लग्न, मधुचंद्रानंतर जिने दगा दिला तिच्यासोबत नवरा फरार
Love Cheat
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Mar 31, 2025 | 9:45 AM

लग्न सोहळा सुरु आहे आणि त्याचवेळी नवरा किंवा नवरी यापैकी एकाने लग्नाला नकार दिला, तर?. अशावेळी दोन्ही कुटुंबांवर काय अवस्था ओढवेल. मध्य प्रदेशच्या धतरपुरमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. नवरीने वरासोबत विवाह मंडपात सात फेरे घेण्यास नकार दिला. त्याचवेळी लोकलाजेस्तव मुलाच्या वडिलांनी आपल्याच नात्यातील मुलीला म्हटलं, ‘मुली तू आमच्या मुलाशी लग्न कर, आमची अब्रू वाचेल’. मुलगी तयार झाली. तिने त्याच मंडपात मुलाशी लग्न केलं. लग्नानंतर मधुचंद्र साजरा केल्यानंतर नवऱ्याने तिला धोका दिला. अचानक तो घरातून गायब झाला. नवीन नवरी नवऱ्याला शोधत बसली. मग, तिला समजलं की, नवरा त्याच मुलीसोबत पळून गेलाय, जिने विवाह मंडपात लग्नाला नकार दिलेला. आता नवीन नवरी न्याय मागत आहे.

पीडित मुलीच नाव सोनम नामदेव आहे. ती सतत नवऱ्याचा शोध घेत आहे. सोनम नामदेवची कथा एखाद्या चित्रपटासारखी आहे. सोनम नामदेव उत्तर प्रदेशच्या महोबाची राहणारी आहे. 3 फेब्रुवारीला तिच लग्न रोहित नामदेवसोबत झालं. सोनमने सांगितलं की, 3 फेब्रुवारीला पती रोहित नामदेवच राधा नावाच्या मुलीसोबत धूम धडाक्यात लग्न होणार होतं. पण सात फेरे घेण्याआधीच राधाने पोलिसांना बोलवून घेतलं. अजून मी 18 वर्षांची झालेली नाही. माझ जबरदस्ती लग्न लावलं जातय हे कारण देऊन तिने लग्न मोडलं.

‘आमची अब्रू वाचेल, आम्ही हुंडावैगेर काही नको’

त्यानंतर पोलीस आणि बाल विकास टीमने हे लग्न रोखलं. आता समाजात आपली खिल्ली उडवली जाणार याची रोहित नामदेव आणि त्याच्या कुटुंबाला चिंता होती. त्यांनी सोनम नामदेवकडे मदत मागितली. ती मुलाच्या नात्यात होती. रोहितचे वडिल सोनमला म्हणाले की, “तू माझ्या मुलाशी लग्न कर. आमची अब्रू वाचेल. आम्ही हुंडावैगेर काही नको” सगळ्याच म्हणण ऐकून सोनम नामदेव त्याच मंडपात लग्नाला तयार झाली. तिने त्याच मांडवात रोहित नामदेवसोबत लग्न केलं.

रील बनवतानाचा फोटो व्हायरल

सोनमने सांगितलं की, लग्नानंतर एक महिना सर्वकाही ठीक होतं. पण एकदिवस अचानक पती गायब झाला. ज्या मुलीने लग्न मोडलेलं, तिच्यासोबतच इन्स्टाग्रामवर नवऱ्याचा रील बनवतानाचा फोटो व्हायरल झाला. तेव्हापासून अजूनपर्यंत पतीचा फोन बंद आहे. ती त्याचा शोध घेत आहे.

पोलिसांकडून दुर्लक्ष

राजनगर पोलीस ठाणे क्षेत्रात लग्न झाल्याचा सोनमचा दावा आहे. तिने राजनगर पोलीस ठाण्यात अनेकदा अर्ज दिलाय. पण पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. हे प्रकरण महोबा जिल्ह्यातल आहे, असं सांगून तिला पळवून लावलं. ती महोबा येथे गेली, तर पोलिसांनी प्रकरण मध्य प्रदेशातील आहे असं सांगून तक्रार नोंदवायला नकार दिला. अखेर हैराण होऊन सोनम छतरपूरच्या एसपी ऑफिसमध्ये गेली. तिने एसपींकडे मदत मागितली आहे.