
भोपाळ : मध्य प्रदेशातील रीवामध्ये बलात्काराचा आरोपी महंत सीताराम (Mahant Sitaram) याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पुस्तैनीमधील त्याच्या घरावर बुलडोझर फिरवून नेस्तनाबूत करण्यात आले आहे. महंताला सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यातत नेऊन त्याची जिल्हा न्यायालयापर्यंत अक्षरशः धिंड काढण्यात आली. गँगरेप प्रकरणातील सर्वच आरोपींच्या संपत्ती हुडकून जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. आरोपी महंत सीताराम दास उर्फ सीताराम त्रिपाठी उर्फ समर्थ याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरौली जिल्ह्यातून अटक झाली. व्हीआयपी राज निवासमध्ये 28 मार्च रोजी कथावाचक महंत सीतारामने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. सीताराम दास वेशांतर करण्यासाठी बैढन बस स्टँडमधील एका सलूनमध्ये गेला होता.
उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेशातही बुलडोझरचा सफाया पाहायला मिळत आहे. राज निवासात झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकारामुळे नाराज झालेल्या शिवराजसिंह चौहान यांचा बुलडोझर महंत सीतारामच्या पुश्तैनीमधील घरापर्यंत पोहोचला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत गुडवा गावातील महंताची निवासी इमारत जमीनदोस्त केली.
राज निवासमध्ये 28 मार्च रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर महंत रात्री आपल्या घरी लपून बसला होता. 30 तारखेला वेशांतर करण्यासाठी तो बैढन बस स्टँडमधील एका सलूनमध्ये गेला होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर इशारा दिल्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने महंत सीतारामला बेड्या ठोकल्या. महंत सीताराम त्रिपाठी, विनोद पाण्डेय, धीरेंद्र मिश्रा आणि मोनू मिश्रा यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्काराचा आरोप असलेला महंत सीताराम पोलीस सुरक्षेतही बाहेर फिरत होता. अनेक मोठमोठे बिल्डर्स आणि उद्योजकही या बाबाचे भक्त असल्याचं बोललं जातं. तो प्रसिद्ध संत आणि माजी राज्यसभा खासदार वेदांती महाराज यांचा जवळचा नातलग असल्याचं सांगितलं जातं.
फक्त राजकीय नेतेच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांचाही बाबाच्या भक्तांमध्ये समावेश आहे. एका फोटोत मध्य प्रदेशच्या रीवामधील एसपी नवनीत भसीन यांच्यासोबतचा फोटोही समोर आला आहे. यात एसपी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जात असल्याचं दिसून आलं आहे.
संबंधित बातम्या :
आधी IPS, नेते हात जोडून उभे असायचे आता त्यांनीच ‘भगवा’ उतरवला, रेपचा आरोपी सीताराम दास अखेर अटकेत
बलात्काराचा आरोप असलेला बाबा सीताराम दास साधासुधा नाही! SP, IAS आणि आमदारांचीही बाबावर मर्जी?