AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahant Rape MP : आधी IPS, नेते हात जोडून उभे असायचे आता त्यांनीच ‘भगवा’ उतरवला, रेपचा आरोपी सीताराम दास अखेर अटकेत

व्हीआयपी राज निवासमध्ये 28 मार्च रोजी कथावाचक महंत सीतारामने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. महंत सीताराम दास उर्फ सीताराम त्रिपाठी उर्फ समर्थ याला पोलिसांनी सिंगरौली जिल्ह्यातून अटक केली आहे

Mahant Rape MP : आधी IPS, नेते हात जोडून उभे असायचे आता त्यांनीच 'भगवा' उतरवला, रेपचा आरोपी सीताराम दास अखेर अटकेत
महंत सीतारामImage Credit source: टीव्ही9
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 31, 2022 | 3:25 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवामध्ये बलात्काराचा आरोपी महंत सीताराम (Mahant Sitaram) याला पोलिसांनी अटक केली आहे. महंत वेशांतर करुव उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. आतापर्यंत पोलिसांनी दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत, तर दोघा आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपी महंत सीतारामला पोलिसांनी मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून अटक केली. व्हीआयपी राज निवासमध्ये 28 मार्च रोजी कथावाचक महंत सीतारामने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. महंत सीताराम दास उर्फ सीताराम त्रिपाठी उर्फ समर्थ याला पोलिसांनी सिंगरौली जिल्ह्यातून अटक केली आहे. सीताराम दास वेशांतर करण्यासाठी बैढन बस स्टँडमधील एका सलूनमध्ये गेला होता.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर इशारा दिल्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने महंत सीतारामला बेड्या ठोकल्या. महंत सीताराम त्रिपाठी, विनोद पाण्डेय, धीरेंद्र मिश्रा आणि मोनू मिश्रा यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक झाली असून दोघं फरार आहेत.

पोलीस सुरक्षेतही बाहेर

बलात्काराचा आरोप असलेला महंत सीताराम पोलीस सुरक्षेतही बाहेर फिरत होता. अनेक मोठमोठे बिल्डर्स आणि उद्योजकही या बाबाचे भक्त असल्याचं बोललं जातं. तो प्रसिद्ध संत आणि माजी राज्यसभा खासदार वेदांती महाराज यांचा जवळचा नातलग असल्याचं सांगितलं जातं.

फक्त राजकीय नेतेच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांचाही बाबाच्या भक्तांमध्ये समावेश आहे. एका फोटोत मध्य प्रदेशच्या रीवामधील एसपी नवनीत भसीन यांच्यासोबतचा फोटोही समोर आला आहे. यात एसपी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जात असल्याचं दिसून आलं आहे.

संबंधित बातम्या :

बलात्काराचा आरोप असलेला बाबा सीताराम दास साधासुधा नाही! SP, IAS आणि आमदारांचीही बाबावर मर्जी?

दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण

भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस? शिवसेना आमदाराची भावजयीला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...