Molestation | दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण

भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. राष्ट्रवादीचा नेता आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर याने हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे

Molestation | दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण
आरोपी सुमीत श्यामकुंवरImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 7:43 AM

भंडारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याच्या गुन्हात अडकलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नेता अखेर भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलिसांना शरण आला आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा त्याने पोलिसात आत्मसमर्पण केले. तब्बल 23 दिवसांच्या कालावधीनंतर आंधळगाव पोलिसांना त्याने आत्मसमर्पित केले आहे. सुमेध श्यामकुवर (Sumedh Shyamkunwar) असे आरोपी नेत्याचे नाव आहे. शरणागती पत्करल्यानंतर आंधळगाव पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करत रात्री उशिरा त्याला अटकही केली. कोर्टासमोर आज त्याला हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे आरोपी महिन्याभरापासून अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फेऱ्या मारत होता. मात्र भंडारा पोलिसांच्या जामिनावर हरकत घेण्याच्या अॅफिडेविटमुळे त्याचा जामीन अर्ज रद्द झाला. अखेर सुमेध श्यामकुवर याने आंधळगाव पोलिसांना आत्मसमर्पित केले आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. राष्ट्रवादीचा नेता आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर याने हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव विहीरगाव रोडच्या शिवारात आपली कार थांबून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना 25 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती.

दरम्यान 26 फेब्रुवारीला आंधळगाव पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध शमकुवर यांच्यावर पॉस्को कलम आठ आणि 354 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार त्यांची गाडी क्रमांक MH 36H7009 मारुती सुझुकी वॅगनआर ही आंधळगाव पोलिसांनी भंडारा येथून जप्त केली. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी तपास करत मुलीच्या फिर्यादीवरुन ठाणेदार सुरेश मटामी यांनी कलम 354 आणि पॉस्को 8 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत होते.

पीडिता दहावीची विद्यार्थिनी

पीडित मुलगीही तुमसर तालुक्यातील असून आदिवासी समाजातील आहे. भंडारा येथील शाळेत दहावीत शिकत होती. तर आरोपी सुमित श्यामकुवर यांचे भंडारा शहरात राजीव गांधी चौकात यशोधन ग्रामीण शिक्षण संस्थाद्वारा संचालित महिला समाज मुलीचे वसतिगृहात ती वास्तव्यास होती.

वसतिगृहाचे मालक स्वतः त्या मुलीला जांब येथे चारचाकी गाडीने नेण्यास आले. शासनाने नुकतेच वसतिगृहात मुला-मुलींना राहण्याची परवानगी दिली असल्याने बाहेरगावी असलेल्या मुलींना आणण्यासाठी संपर्क केल्याचे त्यांनी सांगितले. आंधळगाव पोलीस स्टेशनजवळील डोंगरगाव विहिरगाव रोडवर गाडी थांबून पीडित मुलीची छेडखानी केल्याचा आरोप या मुलीने पोलीस स्टेशन आंधळगावला केली. या प्रकरणी श्यामकुवर यांनी आत्मसमर्पण केल्याने काल उशिरा रात्री त्यांना अटक दाखवत आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : मुलीची छेड काढत मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराची लातूर पोलिसांकडून धिंड

भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस? शिवसेना आमदाराची भावजयीला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांची चाकूने भोसकून हत्या, बिहारमधील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.