कुठे गेली माणुसकी? अचानक हार्ट अटॅक आला, जगण्यासाठी जीव तडफडत होता, पण मालक मात्र मस्त…

सध्याच्या दुनियेत माणुसकी हरवत चालली आहे. त्याचं एक धक्कादायक उदहारण समोर आलं आहे. माणूस म्हणून आपण कुठे चाललो आहोत, नक्कीच यामुळे आपल्याला विचार करावा लागेल.

कुठे गेली माणुसकी? अचानक हार्ट अटॅक आला, जगण्यासाठी जीव तडफडत होता, पण मालक मात्र मस्त...
Employee Heart Attack
| Updated on: Oct 11, 2025 | 8:46 AM

सध्याच्या जगात माणुसकी हरवत चालली आहे. त्याची अनेक उदाहरणं आपल्या आसपास आपण पाहत असतो. एखादा अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी व्हिडिओ शूट केले जातात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणूस म्हणून आपल्याला नक्कीच यामुळे विचार करावा लागेल. दुकानात काम करत असताना अचानक एका कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक आला. त्यामुळे दुकानातच तो खुर्चीवर बसला. पण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला वेळेवर रुग्णालयात पोहोचवलं असतं, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय.

याच कर्मचारी हार्ट अटॅकनंतर तडफडताना दिसतोय. दुकानाचा मालक आपल्या खुर्चीवरुन उठला देखील नाही. तो आरामात तिथे बसून मोबाईलमध्ये व्यस्त होता. माणूसकी हरवल्याची ही घटना मध्य प्रदेशच्या आगर मलवा जिल्ह्यातील आहे.

व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले

काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर क्षेत्रातील आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा फक्त एका कर्मचाऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न नाहीय, तर नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.6 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी नेहमीप्रमाणे त्याच्या कामात व्यस्त असल्याच दिसतं. अचानक तो तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसतो.

खुर्चीवर बसल्याजागी तो तडफडत होता

या व्हिडिओमध्ये दिसतय अचानक हा कर्मचारी अस्वस्थ होतो. त्याचं शरीर आकडू लागतं. वारंवार तो हात-पाय मारु लागतो. खुर्चीवर बसल्याजागी तो तडफडत होता. त्याची शारीरिक स्थिती पाहून तात्काळ त्याला वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं दिसतं.सहकाऱ्याला असं तडफडताना पाहून अन्य कर्मचारी टेन्शनमध्ये आले. ते त्याच्या जवळ जातात. पाणी पाजतात. त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात.

अवघ्या 6 मिनिटात प्राण सोडले

यावेळी दुकानाचा मालक आरामात खुर्चीवर बसून हे सर्व पाहत होता. तो आपल्या जागेवरुन उठला नाही. कुठलीही वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला नाही. रुग्णवाहिका बोलावली नाही. तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. वेदनेने तडफडणाऱ्या या कर्मचाऱ्याने अवघ्या 6 मिनिटात प्राण सोडले.