बसची बाईकला जोरदार धडक, तिघा जीवलग मित्रांचा करुण अंत

| Updated on: Mar 03, 2022 | 7:52 AM

तिघं जण प्रवास करत असलेल्या बुलेटला भरधाव बसने जोराची धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बसची बाईकला जोरदार धडक, तिघा जीवलग मित्रांचा करुण अंत
बसच्या धडकेत बाईकस्वार तरुणांचा अंत
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

बीड : बाईक अपघातात तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Bike Accident) समोर आली आहे. बीडमध्ये (Beed) घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकवरुन प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या तरुणाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule Solapur National Highway) खजाना विहिरीजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिघेही जण बुलेटवरुन बीडच्या दिशेने येत असताना समोरुन येणाऱ्या बसने त्यांना उडवलं. ही धडक इतकी जबर होती, की दोघांचा जागीच अंत झाला, तर उपचार सुरु असताना तिसऱ्या मित्राने प्राण गमावले.

नेमकं काय घडलं?

तिघा जीवलग मित्रांचा बाईक अपघातात मृत्यू झाल्याची करुणाजनक घटना उघडकीस आली आहे. तिघं जण प्रवास करत असलेल्या बुलेटला भरधाव बसने जोराची धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ घडली.

पारसनाथ मनोहर रोहिटे (वय 22 वर्ष, रा. आहेरवडगाव, ता. बीड), कृष्णा भारत शेळके (वय 23 वर्ष, रा. दगडी शहाजानपूर ता. बीड), अक्षय सुरेश मुळे (वय 22 वर्ष, रा. घोडकाराजुरी ता. बीड) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावं आहेत.

दोघांचा जागीच मृत्यू

तिघे मित्र बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन येत होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसने जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ आणि कृष्णा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अक्षयचीही प्राणज्योत मालवली.

संबंधित बातम्या :

महाशिवरात्री यात्रा अखेरची ठरली, मित्राला सोडून परतताना बाईक झाडावर आदळली, तरुणाचा जागीच अंत

बंद पडलेल्या ट्रकवर धडकून बाईक अडकली, वर्ध्यात भीषण अपघात, दोघांचा जागीच अंत

बाईकवरुन युटर्न घेत होते, भरधाव एसटी दिसलीच नाही, जे घडलं, ते भयाण होतं!