बहिणीच्या लग्नाची लगबग, भावावर काळाचा घाला, 21 वर्षीय बाईकस्वाराचा जिपच्या धडकेत मृत्यू

| Updated on: May 17, 2022 | 12:11 PM

हदगाव तालुक्यातील रूई येथील तरुणाला यळंब पाटी ता. हदगाव येथे अपघात झाला. 16 मे सोमवार रोजी 10 वाजता वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता.

बहिणीच्या लग्नाची लगबग, भावावर काळाचा घाला, 21 वर्षीय बाईकस्वाराचा जिपच्या धडकेत मृत्यू
नांदेडमध्ये भावाचा अपघाती मृत्यू
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

नांदेड : बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असताना धावपळ करताना भावाचा अपघाती (Bike Accident) मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील रुई गावातील ही दुर्दैवी घटना (Nanded Crime News) घडल्याचं समोर आलं आहे. 21 वर्षीय ओंकार वानखेडे हा दुचाकीवरून जात असताना जीपच्या धडकेत जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत युवकाच्या बहिणीचे लग्न (Sisters Wedding) अवघ्या दहा दिवसांवर आले होते, त्यात या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाल्याने रुई गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

हदगाव तालुक्यातील रूई येथील तरुणाला यळंब पाटी ता. हदगाव येथे अपघात झाला. 16 मे सोमवार रोजी 10 वाजता वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

दुध वाहतूक करणाऱ्या जिपची धडक

रूई येथील ओमकार बालाजी वानखेडे (वय 21 वर्ष, रा. रूई ता. हदगाव) या तरुणाला दुध वाहतूक करणारी लोडींग जिपने यळंब पाटी जवळ जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले होते. उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

लग्नाच्या लगबगीत अपघात

10 दिवसावर बहिणीचा विवाह आला होता, लग्नाची लगबग सुरू होती. काळाने वानखेडे कुटुंबातील एकुलता एक मुलगा ओमकार बालाजी वानखेडे याला हिरावला. त्याचे अपघातात निधन झाल्यामुळे दु:खाचे सावट पसरले आहे. या अपघातामुळे रूई गावात हळहळ व्यक्त होत आहे