CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन जवळील भोगले अ‍ॅटोमोटिव्हीव्ह कंपनीमध्ये 10 ते 15 जणांचा जमाव घुसला आणि सरळ अधिकारी आणि कर्मचारी यांना मारहाण केली.

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण
राम भोगलेंच्या कार्यालयात घुसून गुंडगिरी
Reporter Datta Kanwate | Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 11, 2021 | 11:00 AM

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढत आहे. औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सीसीटीव्हीत दिसत असलेली ही गुंडगिरी औरंगाबाद शहरातील भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील आहे. या कंपनीचे मालक राम भोगले यांचा औरंगाबादेतील औद्योगिक वसाहत वाढवण्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि त्याच राम भोगले यांच्या भावाला हे गुंड मारहाण करत आहेत.

शहरातील रेल्वे स्टेशन जवळील भोगले अ‍ॅटोमोटिव्हीव्ह कंपनी मध्ये 10 ते 15 जणांचा जमाव घुसला आणि सरळ अधिकारी आणि कर्मचारी यांना मारहाण केली. औरंगाबादमध्ये हे असेच दादागिरीचे प्रकार वाढत असल्याने उद्योग बंद का करू नयेत, हा प्रश्न आता उद्योजकांना पडला आहे.

राम भोगले काय म्हणाले?

आमच्या कारखान्यातील एका कामगाराने डायल्युटेड सोप वाटर प्यायलं होतं. त्यानंतर आम्ही त्या कामगाराला रुग्णालयात भरती केलं, मात्र त्यानंतर आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने आमच्या कंपनीचे सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. यानंतर पोलीस येतायत म्हटल्यानंतर या सगळ्यांनी पळ काढला पण असे प्रकार सातत्याने आणि उद्योगात सर्वत्र घडत आहेत. त्यामुळे उद्योजकांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं राम भोगले म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

भंडाऱ्यात देवीच्या मंदिरात चोरी करणारे, शहरात घरफोडी करणारे चोरटे अखेर गजाआड, पोलिसांची मोठी कारवाई

VIDEO : वाळू माफियांची गुंडगिरी, भर बाजारात पत्रकारावर भीषण हल्ला, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

Follow Us