भंडाऱ्यात देवीच्या मंदिरात चोरी करणारे, शहरात घरफोडी करणारे चोरटे अखेर गजाआड, पोलिसांची मोठी कारवाई

पवनी शहरात घरफोडी करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे (two burglars arrested in bhandara).

भंडाऱ्यात देवीच्या मंदिरात चोरी करणारे, शहरात घरफोडी करणारे चोरटे अखेर गजाआड, पोलिसांची मोठी कारवाई
भंडाऱ्यात देवीच्या मंदिरात चोरी करणारे, शहरात घरफोडी करणारे चोरटे अखेर गजाआड, पोलिसांची मोठी कारवाई

भंडारा : पवनी शहरात घरफोडी करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पंचक्रोशितील प्रसिद्ध देवीच्या मंदिरातही चोरी केली होती. अखेर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि पवनी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. प्रवीण अशोक डेकाटे (वय 24) आणि विनोद पंचमशील परिहार (वय 39) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी देवीच्या मंदिरातही चोरी केली होती (two burglars arrested in bhandara).

पंचक्रोशित प्रसिद्ध असलेल्या देवस्थानात चोरी

पवनी शहरात 8 जूनला घरफोडीची घटना समोर आली होती. पवनी शहरातील रहिवासी सुरेश अवसरे यांच्या घराचे कुलूप तोडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि मोबाईल चोरी करून चोरटे पसार झाले होते. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत तर शहराच्या अन्य भागातही चोरट्यांनी मोटारसायकल चोरीवर डल्ला मारला होता. यात पंचक्रोशित प्रसिद्ध असलेले देवस्थान देखील सुटले नाही.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

पवनी पोलिसांनी मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची क्लिप एलसीबी कार्यालयाकडे सोपविली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाची सूत्रे चालऊन चोरट्यांना पकडण्यात यश संपादन केले. चोरलेल्या लॅपटॉपच्या लोकेशनवरून आरोपींना साकोली तालुक्यातील शिवणीबांध येथून अटक करण्यात आलं. त्यानंतर आरोपींना पवनी पोलिसांकडे सोपविण्यात आले. अटक केलेल्या आरोपींकडून सुरेश अवसरे यांचा लॅपटॉप जप्त करण्यात आला असून उर्वरित साहित्य चोरल्याची कबुली दिली (two burglars arrested in bhandara).

हेही वाचा : शेतकरी महिलेला अश्रू अनावर, कष्टाने पैसे उभे केले, बियाणे घेण्यासाठी बँकेतून पैसे काढले, आणि….

Published On - 4:53 pm, Sat, 12 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI