Sanjay Biyani Murder | रेकॉर्डवरील 40 गुन्हेगार ताब्यात, बियाणींच्या मर्डरनंतर नांदेड पोलिसांची झाडाझडती

| Updated on: Apr 13, 2022 | 1:40 PM

या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पथकात स्वतः पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक इतक्याच मोजक्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Sanjay Biyani Murder | रेकॉर्डवरील 40 गुन्हेगार ताब्यात, बियाणींच्या मर्डरनंतर नांदेड पोलिसांची झाडाझडती
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नांदेड : सण उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नांदेड पोलिसांनी (Nanded Police) धडक कारवाई सुरु केली आहे. गुन्हेगारांच्या विरोधात नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. यात आतापर्यंत रेकॉर्डवरील 40 गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एकाला हद्दपार करण्यात आलं आहे. यासोबतच संशयित आरोपींच्या घराची झडती घेतली जात असून दोघांच्या घरी शस्त्रं आढळल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी ही मोहीम सुरु केली. दरम्यान रात्री अपरात्री विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या टारगट युवकांनाही पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद दिला जात आहे. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या (Sanjay Biyani Murder Case) हत्येचा तपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी ‘टीव्ही9 मराठी’ला दिली आहे. बियाणी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाला हत्येमागची कारणे समजल्याचेही सूत्रांने स्पष्ट केलं आहे.

माहिती लीक न होण्यासाठी प्रयत्न

या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पथकात स्वतः पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक इतक्याच मोजक्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे तपासाची माहिती “बाहेर” जाऊ नये याची कटाक्षाने काळजी घेण्यात येत आहे. या हत्येनंतर नांदेडमध्ये पोलीस चांगलेच अॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत. त्यातून गुन्हेगारांनी नांदेड सोडून पळ काढण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या मंगळवारी म्हणजेच 5 एप्रिलला सकाळी 11 वाजताच्या सुमारास संजय बियाणींवर त्यांच्या राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. खंडणी वसुलीच्या कारणावरुन त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, तर सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप बियाणींच्या पत्नीने केला आहे. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.

संबंधित बातम्या :

बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

Sanjay Biyani हत्याकांड, नांदेड एकटवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी

Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येचा कट परभणीत? कुटुंबीयांना आलेल्या निनावी पत्राने खळबळ