AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येचा कट परभणीत? कुटुंबीयांना आलेल्या निनावी पत्राने खळबळ

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेडमध्ये पोलीस अॅक्टिव्ह झाले आहेत, मात्र हत्येचा अद्याप साधा सुगावाही लागलेला नाही. या दरम्यान तपासणी मोहिमेत युवकांवरही कारवाई झाली आहे.

Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येचा कट परभणीत? कुटुंबीयांना आलेल्या निनावी पत्राने खळबळ
संजय बियाणींच्या कुटुंबीयांना आलेलं निनावी पत्रImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 2:47 PM
Share

नांदेड : नांदेड शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला एक पत्र आलं आहे. बियाणींना जीवे ठार मारण्याचा प्लॅन परभणीत झाल्याचा दावा या पत्रात (Letter) करण्यात आला आहे. या पत्रात रेती माफियांचा उल्लेख असून एका व्यक्तीच्या नावाचाही उल्लेख असल्याची माहिती आहे. मात्र या पत्राबद्दल काहीही बोलण्यास पोलिसांनी तूर्त नकार दिला आहे. कारण हे पत्र म्हणजे एक प्रकारचा खोडसाळपणाही असू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र या पत्रामुळे संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी (Nanded Crime) काहीतरी सुगावा लागतो का याबाबत आशा निर्माण झाली आहे. हे पत्र निनावी असून स्पीड पोस्टने आल्याचे सांगण्यात येत आहे. तर पत्रात लिहिलेला मजकूर हिंदी भाषेत असल्याचंही सांगितलं जात आहे.

काय आहे पत्र?

बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुवा, जिसमे आनंद नगर से बहुत बडा दादा पांडुरंग येवले परभणी आया था…. जिसेने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नही करते… अशा आशयाचे निनावी पत्र संजय बियाणी यांच्या घरी धडकले आहे. त्यामुळे आधीच दहशतीच्या छायेत वावरत असणारे बियाणी कुटुंबीय या पत्रामुळे आणखी भयभीत झाले आहे.

बियाणी हत्येप्रकरणी पोलिसांचे हात रिकामेच

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेडमध्ये पोलीस अॅक्टिव्ह झाले आहेत, मात्र हत्येचा अद्याप साधा सुगावाही लागलेला नाही. या दरम्यान तपासणी मोहिमेत युवकांवरही कारवाई झाली आहे.

जनतेमध्ये अफवांचं पीक

दरम्यान बियाणी हत्याकांडाचा काहीच उलगडा होत नसल्याने नांदेडमध्ये सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. या दरम्यान खंडणीसाठी गुंडाचे फोन येण्याच्या अफवा वाढल्या आहेत तर बियाणींची हत्या नेमकी कश्यामुळे झाली, यावर चर्चा होताना दिसत आहेत.

दरम्यान, बियाणी यांच्या हत्येचा तपास लावावा, या मागणीसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिला आहे. त्यामुळे हत्येच्या तपासासाठी पोलीस प्रचंड अस्वस्थ होऊन काम करत आहेत. मात्र या क्षणापर्यंत पोलिसांना हत्येचा साधा सुगावाही लागलेला नाही.

काय आहे प्रकरण?

गेल्या मंगळवारी म्हणजेच 5 एप्रिलला सकाळी 11 वाजताच्या सुमारास संजय बियाणींवर त्यांच्या राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. खंडणी वसुलीच्या कारणावरुन त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, तर सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप बियाणींच्या पत्नीने केला आहे. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.

संबंधित बातम्या :

बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

Sanjay Biyani हत्याकांड, नांदेड एकटवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी

Sanjay Biyani | घराबाहेर गोळीबार ते बायकोचे आरोप, 10 मुद्द्यात बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरण घ्या समजून

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.