एक लाखाच्या लाचेची मागणी, उस्मानाबादेत पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई

| Updated on: Oct 14, 2021 | 10:09 AM

तडजोड अंती 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याचे मुंडे यांनी मान्य केले होते. लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक, उस्मानाबाद विभागाने कारवाई केली.

एक लाखाच्या लाचेची मागणी, उस्मानाबादेत पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई
उस्मानाबादेत पोलीस निरीक्षकावर कारवाई
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबादमधील येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश मुंढे आणि पोलीस पाटील यांच्यावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केली आहे. निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

येरमाळा पोलिसात गणेश मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तडजोड अंती 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याचे मुंडे यांनी मान्य केले होते. लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक, उस्मानाबाद विभागाने कारवाई केली.

विशेष म्हणजे या प्रकरणात पोलीस पाटील हा भागीदार व मध्यस्थी आहे. दरम्यान गणेश मुंडे व पोलीस पाटील हे दोघेही फरार आहेत. ज्या पोलीस ठाण्यात मुंडे कार्यरत होते तिथेच त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एक लाखांच्या लाचेची मागणी

तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे, स.पो.नि. पो.स्टे. येरमाळा यांनी रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फ़तीने तक्रारदार यांच्याकडे 22 ऑगस्ट 2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तड़जोडी अंती दोन्ही आरोपी यांनी 70 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते.

आरोपी यांची लाच मागणी पडताळणी केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद .विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड,विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.लाचेसंबंधी तक्रार असल्यास प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्याकडे मोबाइल क्र.95279 43100 ,कार्यालय क्र.02472 222879 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक लाच घेताना रंगेहाथ

गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक आणि दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेनन यांना 10 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेआहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत विभागाची आजपर्यंतची ही पहिलीच घटना आहे.

तक्रारदाराचे हार्डवेअर आणि भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नूतनीकरण आणि हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु राजेश मेनन यांनी यासाठी 10 हजारांची मागणी केली होती.

एसीबीकडे तक्रार

काही दिवसांनी परत तक्रारदार हे बँकेत 900 रुपये भरल्याची चालान पावती जमा केली होती. मात्र बुधवारी फिर्यादी हे परवाना हस्तांतरणासाठी विचारपूस करायला आले असता, मेनन यांनी तक्रारदारास 11 हजार रुपयाची मागणी केली. मात्र तक्रारदारास लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागात तक्रार नोंदवली.

दहा हजार घेताना रंगेहाथ

त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंचासमक्ष 10 हजाराची तडजोडी अंती मागणी करुन ती रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात गोंदिया लाचलुचपत विभागाच्या वतीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आरोपी राजेश मेनन यास ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या :

गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक लाच घेताना रंगेहाथ, दहा हजार स्वीकारताना अटकेत

अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पैशांची मागणी; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले