अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पैशांची मागणी; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

ACB | भिवंडी शहरातील मौजे कामतघर हद्दीतील महसूल विभागाच्या नावे सर्व्हे क्रमांक 42/अ/3 ही 60 गुंठे ही जागा आहे .परंतु सदर जागा भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या ताब्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी देण्यात आली होती. परंतु या जागेवर व्यवसायिक गाळे उभारण्यात आले होते.

अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पैशांची मागणी; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
काँग्रेस नगरसेवकाला अटक
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 6:45 AM

ठाणे: भिवंडीत अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

भिवंडी शहरातील मौजे कामतघर हद्दीतील महसूल विभागाच्या नावे सर्व्हे क्रमांक 42/अ/3 ही 60 गुंठे जागा आहे .परंतु सदर जागा भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ताब्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी देण्यात आली होती. परंतु या जागेवर व्यवसायिक गाळे उभारण्यात आले होते. सदर गाळे पालिकेने रस्ता रुंदीकरणात तोडले असता भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून 67 गाळे उभारण्यात आले असून याबाबत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महानगरपालिका व महसूल विभागाकडे तक्रार करून सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

याबाबत दुकान मालकांनी मध्यस्थी करून कारवाई न करण्याबाबत विनंती केली असता सिद्धेश्वर कामूर्ती यांनी राजकुमार चव्हाण यांच्याकडे त्यांच्या मालकीचा फार्म हाऊस नावे करून द्यावा अथवा दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली. अखेर 50 लाखात तडजोड झाली. त्याबाबत राजकुमार चव्हाण यांनी लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी सापळा रचून पद्मानगर भाजी मार्केट येथे सिद्धेश्वर कामूर्ती यांना रंगेहाथ पकडले. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.

इतर बातम्या:

नात्याची राखरांगोळी, बापाकडून बलात्कार, नंतर राजकीय नेत्यांकडूनही अत्याचार, अल्पवयीन पीडितेचे 25 पेक्षा जास्त जणांवर बलात्काराचे आरोप

पोटच्या मुलाने पित्याच्या डोक्यात पार घातली, रक्तबंबाळ पित्याचा तडफडून मृत्यू, सांगलीतील वेदनादायी घटना

Crime : आधी डोळ्यात मिरची फेकली, नंतर चाकूने केले अनेक वार, तरुणाचा जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.