नात्याची राखरांगोळी, बापाकडून बलात्कार, नंतर राजकीय नेत्यांकडूनही अत्याचार, अल्पवयीन पीडितेचे 25 पेक्षा जास्त जणांवर बलात्काराचे आरोप

उत्तर प्रदेशच्या ललितपूरचे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक यादव यांच्यावर अल्पवयीन मुलीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तसेच आपण सहावी इयत्तेत शिकत असल्यापासून आपल्या जन्मदात्या वडिलांकडून वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केलाय.

नात्याची राखरांगोळी, बापाकडून बलात्कार, नंतर राजकीय नेत्यांकडूनही अत्याचार, अल्पवयीन पीडितेचे 25 पेक्षा जास्त जणांवर बलात्काराचे आरोप
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 7:36 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या ललितपूरचे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक यादव यांच्यावर अल्पवयीन मुलीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तसेच आपण सहावी इयत्तेत शिकत असल्यापासून आपल्या जन्मदात्या वडिलांकडून वारंवार बलात्कार करण्यात आला. तसेच वडिलांनी तिलक यादव यांच्याकडूनही बलात्कार केला आणि यादव यांच्या तीनही लहान भावांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला, असे गंभीर आरोप इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन पीडितेने केला आहे. याबाबतचं वृत्त ‘आजतक’ने प्रकाशित केलं आहे.

संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर ललितपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक यादव यांनी या सर्व आरोपांचे खंडन केलं आहे. या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी व्हावी, तसं न झाल्यास भर चौकात आत्महत्या करेन, असं तिलक यादव म्हणाले आहेत. त्यामुळे नेमकं खरं कोण? हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून सुरु आहे.

पीडितेची पोलीस ठाण्यात तक्रार

पीडित 17 वर्षीय मुलीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात बलात्कार आणि षडयंत्र रचनेसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहेत. पण या प्रकरणामुळे बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासली आहे. दरम्यान, सपा जिल्हाध्यक्ष वगळता पीडितेने बसपा जिल्हाध्यक्ष, एक इंजिनिअर यांच्यासह इतर सपा नेते आणि नातेवाईकांसह 3 अज्ञात माणसं तसेच 25 ओळखीच्या लोकांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मुलीचा नेमका आरोप काय?

तक्रारदार अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. आपण जेव्हा सहावी इयत्तेत होतो तेव्हापासून वडिलांनी वारंवार लैंगिक शोषण केलं. समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक यादव यांच्याकडूनही पित्याने आपला बलात्कार केला. तसेच तिलक यादव यांच्या 3 लहान भावांनी देखील बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला.

‘वडिलांनी आधी मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडीओ दाखवला, आईला जीवे मारण्याची धमकी’

“मी जेव्हा सहावी इयत्ते शिकत होते त्यावेळी एकेदिवशी माझे वडील मला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेले. तिथे त्यांनी मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला जेव्हा मी विरोध केला तेव्हा वडील खूप ओरडले. त्यानंतर दुसऱ्याचदिवशी वडील मला नवे कपडे आणले. ते मला बाईक शिकवण्याच्या बहाण्याने रात्री शेतात घेऊन गेले. तिथे त्यांनी माझ्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत आपल्या आईला सांगितलं तर तिला जीवे मारेल, अशी धमकी दिली. त्यामुळे मी खूप घाबरली होती”, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

‘सपा जिल्हाध्यक्ष, त्याच्या तीनही भावांकडून बलात्कार’

“या घटनेनंतर माझ्यावर वारंवार बलात्कार केला जात होता. एकादिवशी वडील शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जाण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पाणीपुरीत गुंगीचं औषध टाकून खाऊ घातलं. त्यानंतर हॉटेलमध्ये घेऊन जाऊन एका इसमाकडून माझ्यावर बलात्कार केला. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एकटी होती. त्यानंतर मी घरी पोहोचली तेव्हा माझे वडील प्रचंड ओरडले. तसेच यापुढे तुला तसंच करावं लागेल, असं सांगितलं. तसेच तसं नाही केलं तर तुझ्या आईला मारुन टाकेन, अशी धमकी दिली. पित्याने ओळखीच्या लोकांकडून माझ्यावर बलात्कार करुन घेतला. यामध्ये सपा जिल्हाध्यक्ष तिलक यादव, त्यांचे भाऊ महेंद्र यादव, राजू यादव आणि अरविंद यादव यांचाही समावेश आहे”, असं अल्पवयीन पीडिता म्हणाली.

हेही वाचा :

घरफोडीनंतर निराशा, उपजिल्हाधिकाऱ्यांना चिठ्ठीतून जाब विचारणारा 24 वर्षांचा चोर सापडला

लग्नानंतर प्रेमी जोडप्याची विष प्राशन करुन आत्महत्या, प्रियकराचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे कारण

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.